मुकेश अंबानी यांना ‘या’ उद्योगपतीने टाकले मागे अन् झाला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0

 

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून चीनचे उद्योगपती झोंग शानशान आशियातील सर्वा ब्लूमबर्ग बिलियनेरत श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. अशी माहितीच्या अहवालानुसार समोर आली आहे.

चीनचे झोंग शानशान यांना जगभरात वॉटर किंग म्हणून ओळखले जाते. त्यांची २०१९ ची नेटवर्थ ७०.९ वरून ७७.८ अब्ज डॉलर झाली आहे. त्यांनी चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनाही मागे टाकले आहे.

आता झोंग शानशान जगातील ११ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहे. शानशान यांचा बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आहे. तसेच कोरोनाच्या संकटात ते कोरोना लस बनवण्यात पण सक्रिय होते.

झोंग शानशान Nongfu आणि Wantai सारख्या कंपनीचे मालक आहे. सप्टेंबर महिन्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा अहवाल ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सने प्रसिद्ध केला होता.

तेव्हा झोंग शानशान जगातील १७ व्या श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. तसेच ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होते. आता झोंग शानशान आशियातील पहिले श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

मिनरल वॉटरसोबतच त्यांचा पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग क्षेत्रात पण व्यवसाय आहे. ब्लूमबर्ग बिलियनेरच्या अहवालानुसार, संपत्तीत सर्वात जलद वाढ होण्याचा हा विक्रम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.