युवराजची ‘ती’ धडाकेबाज खेळी, जेव्हा त्याने जीव पणाला लावून शतक ठोकत भारताला जिंकवले होते

0

२०११ च्या वर्ल्ड कपशी भारतातील क्रिकेट प्रेमींच्या खुप आठवणी जुळलेल्या आहे. भारताने हा कप तब्बल २८ वर्षांनंतर जिंकला होता. तसेच या वर्ल्ड कपची प्रत्येक मॅच खास होती.

आज आम्ही तुम्हाला वर्ल्ड कपच्या अशा एका मॅचबद्दल सांगणार आहोत, ज्या मॅचमध्ये युवराज सिंगने जीव पणालालाऊन देशासाठी एक धडाकेबाज खेळी खेळली होती, इतकेच नाही तर त्याने या मॅचमध्ये शतक सुद्धा ठोकले होते.

२०११ च्या वर्ल्ड कपच्या त्या सामन्यामध्ये भारताच्या विरोधात वेस्ट इंडिजची टीम होती. त्याच्या आधीचा सामना भारत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध हारला असल्याने भारताला हा सामना जिंकणे गरजचेचे होते.

भारताने आधी टॉस जिंकला आणि बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला ५१ रनांवरच सचिन तेंडूलकर आणि गंभीर आऊट झालेले होते, सुरुवात काही खास काही खास दिसत नव्हती. तिथून पुर्ण जबाबदारी विराट कोहली आणि युवराज सिंगने सांभाळली. पण तितक्यात कोहली ५९ रन बवनून आऊट झाला.

अशात युवराजला साथ देण्यासाठी महेंद्र सिंग धोनी आला. युवराजला या सामन्यात बॅटींग करताना खुप त्रास होत होता, कारण तो आजारी होता, त्याला अनेकवेळा मैदानात उलट्या झाल्या पण तो मैदान सोडून गेला नाही. तो खेळतच राहीला. युवराजची स्थिती पाहून अंपायर सायमन टॉफेलने त्याला खेळ बंद करण्यास सांगितले पण त्याने नकार दिला.

मी मैदान सोडून जाणार नाही, मी दोन वर्षांनंतर शतकच्या जवळ आहे. मी जर मैदानात खेळता खेळता बेशुद्ध पडलो तरच मला हॉस्पिटलला घेऊन जा, तोपर्यंत मी मैदान सोडून जाणार नाही, असे युवराजने अंपायरला म्हटले होते.

त्या सामन्यात युवराजने या सामन्यात १२३ बॉलमध्ये ११३ रन बनवत एक धडाकेबाज शतक ठोकत भारताला २४० रनांच्या पार पोहचवले. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला २६९ रनांचे टार्गेट दिले होते. सामन्यात युवराजने बॉलिंगमध्ये सुद्धा कमाल केली होती.
युवराजने ४ ओव्हर टाकून फक्त १८ रन दिले होते आणि २ विकेट घेतल्या होता, अशा प्रकारे युवराजने सामन्याचा हिरो बनत भारताला विजय मिळवून होता, त्याला बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंटने सन्मानित सुद्धा करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.