आता तुम्हाला जाता येईल फ्रिमध्ये चंद्रावर, जपानच्या अरबपतीचा भन्नाट प्लॅन

0

 

आपण नेहमीच चंद्राला लांबून बघत असतो, अमेक लोकांची चंद्रावर जाण्याचीही इच्छा असते पण ते स्वप्न कोणाचे लवकर पुर्ण होत नाही, पण आता जपानच्या एका माणसाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

जपानच्यामध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव युसाकु मेजावा असे आहे. ते एक अरबपती आहे. मेजावा हे त्यांच्यासोबत आठ लोकांना चंद्रावर नेणार असून त्या लोकांचा पुर्ण खर्च मेजावा उचलणार आहे.

या सर्व लोकांची चंद्रावरची पहिली ट्रिप एलॉन मस्कची स्पेसएक्स कंपनी २०२३ मध्ये नेणार आहे. युसाकू यांचा पहिल्यांदा प्लॅन असा होता की ते कलाकारांना आपल्यासोबत चंद्रावर नेणार होते, पण नंतर त्यांनी तो प्लॅन बददला आणि आता ते जगभरातल्या कोणत्याही ८ लोकांना चंद्रावर नेणार आहे.

जगामधला कोणताही माणूस या मोहिमेचा भाग बनू शकणार आहे. लोक निवडण्याचे पहिले चरण १४ मार्चला होणार आहे. आधी लोकांचे चेकअप होणार आहे, त्यानंतर त्या माणसाची मुलाखत मेजावा यांच्याशी होणार आहे.

युसाकु स्पेसएक्सच्या नेक्स्ट जनरेशन रियुजेबल लाँन्च व्हेयीकल स्टारशिपच्या सोबत जाण्याचा पुर्ण खर्च उचलणार आहे. स्पेसएक्स गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चार ऐस्ट्रोनॉट्सला फॅल्कन ९ रॉकेटशी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर लाँच करण्यात आले आहे.

आधी स्टारशिपच्या दोन प्रोटोटाईपमध्ये टेस्ट दरम्यान विस्फोट झाला होता. पण युसाकू यांनी मस्क यांच्यावर पुर्ण भरोसा असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला त्यांना वाटले होते की मिशन सुरु करण्यास वेळ होईल पण आता सर्व गोष्टीं वेळेवर होत आहे.

मस्क आणि युसाकु यांच्या दोघांचेही सोशल मीडियावर मोठयाप्रमाणात चाहते आहे. यासुका यांच्या ट्विटरवर जपानचे जास्त फॉलोवर्स आहे. या मिशनला युट्युबवर दाखवण्याचा प्लॅनही एलॉन मस्क यांचा असल्याचा म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.