एका फोटोमुळे सफाई कर्मचारी झाला मॉडेल; आता करतोय कंपन्यांशी लाखोंची डील

0

 

अनेकदा एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो, त्यामुळे बऱ्याचदा त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे आयुष्यात कोणती घटना आयुष्याला कलाटणी देऊन जाईल हे सांगता येत नाही.

आजची ही गोष्ट पण अशाच एका तरुणाची आहे. एका फोटोमुळे एक साफसफाई कर्मचारी चक्क एक मॉडेल बनला आहे. ही गोष्ट रशियात राहणाऱ्या युराची.

युरा हा आधी एक साफसफाई कर्मचारी होता. एकदा त्याच्या मित्राने त्याची परिस्थिती दाखवण्यासाठी युराचे फोटो काढले. त्याने एका ऑनलाइन प्रॉजेक्टसाठी युराचे फोटो काढले होते. ते फोटो काढल्यानंतर जे काही घडले ते आश्चर्य चकित करणारेच होते.

त्याच्या मित्राचे नाव रोमान असे आहे. त्याने युराचे शूट यासाठी केले. त्यातून रोमानला युराच्या आयुष्यातला संघर्ष दाखवायचा होता. तो कोणत्या परिस्थितीतुन जात आहे, हे त्याला दाखवायचे होते. रोमाने हे फोटो फेसबुक शेअर केले आणि त्याचे फोटो लोकांना इतके आवडले की त्यातून युराचे आयुष्यच बदलले.

युरा आधी साफसफाईचे काम करायचा, तिथे त्याचे शोषण केले जायचे. स्वतःच कविता लिहायचा, स्वतःच जेवण स्वता: बनवायचा. तो लहानपणापासूनच अनाथ होता. त्यामुळे तो अनेकदा मानसिक तणावात असायचा. एक दिवशी त्याची भेट रोमानच्या आईशी झाली, त्यांनी त्याला चहा दिला.

तसेच तेव्हा युराची सर्व परिस्थिती रोमानच्या आईने कुटूंबाला सांगितली. तेव्हा रोमानच्या आईने आणि रोमानने युराला खुप मदत केली. तेव्हा रोमानने युराची सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि त्याचे साफसफाई करतानाचे फोटो काढले.

तसेच पुढे रोमानने त्याला एक नवीन लुकमध्ये तयार केले आणि पुन्हा त्याचे फोटो काढले. त्याच्या हे फोटो इतके व्हयरल झाले की लोकांकडून त्याला जवळपास ८ लाखांची मदत मिळाली.

आता सोशल मिडीयामधून युराला अनेक कंपन्यांच्या अ‌ॅड मिळत आहे. त्या कामांमधून त्याची चांगलीच कमाई होत आहे. युराची हि गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, जे आपल्या आयुष्यात संघर्ष करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.