छोटू दादा: कमी उंचीमुळे नोकरी भेटत नव्हती, आता युट्युबवरुन करतोय लाखोंची कमाई

0

 

असे म्हणतात ‘फर्स्ट इंम्रेशन इज लास्ट इंम्रेशन’. लोकांना अनेकदा आपण दिसण्यावरुन त्यांचा अंदाज बांधत असतो. पण असा अंदाज बांधणे हे चुकीचे आहे, असे अनेक व्यक्तींनी सिद्ध करुन दाखवले आहे.

अशात जर तुमची उंची छोटी असे तर तुम्हाला लोकांकडून चार टोमनेही मारले जातात. पण काही लोक असे आहेत ज्यांना मुर्ती लहान पण किर्ती महानची उपमा दिली जाते, त्यातलेच एक नाव म्हणजे छोटू दादा.

छोटू दादा हा प्रसिद्ध युट्युबर आहे, तसेच तो युट्युबवर व्हिडिओ बनून लाखोंची कमाई करत आहे. इतकेच नाही तर गेल्यावर्षीच्या टॉप १० युटुयबरच्या लिस्टमध्ये छोटू दादा दुसऱ्या स्थानावर होता.

छोटू दादाचे खरे नाव शफिक नाट्या असे आहे. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १९९१ मध्ये मालेगावला झाला होता. शाळेत शिक्षण घेतानाही त्याला खुप अडचणी आल्या, त्याने १० पर्यंतचे शिक्षण घेतले, पण पुढे मात्र त्याला घरातल्या अडणींमुळे शाळा सोडावी लागली.
त्यांची उंची फक्त ३ फुट ९ इंच आहे, त्यामुळे त्याच्याकडे असल्याने त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे त्याला कोणतेच काम मिळत नव्हते. पण त्याच्याकडे एक कला होती ती म्हणजे तो लोकांना सहज हसवायचा.

एकेदिवशी तो त्याच्या मित्रासोबत एका पार्टीमध्ये गेला होता. तिथे एका चित्रपटाचे दिग्दर्शक आलेला होता. तेव्हा छोटूसाठी कोणती भुमिका असेल तर सांगा असेल तर सांगा, तेव्हा दिग्दर्शकाने त्याला होकार दिला.

त्या दिग्दर्शकाच्या एका चित्रपटाच्या भुमिकेसाठी त्यांनी छोटूशी संपर्क साधला. त्या एका छोट्या भुमिकासाठी छोटूची निवड केली. त्या एका भुमिकेत त्याने चांगला अभिनय केला. त्यानंतर त्या दिग्दर्शकाने त्याला एका शॉर्टफिल्ममध्ये संधी दिली.

त्यानंतर त्याने कधीच मागे वळून नाही बघितले. त्याने सब टिव्हीवरच्या चिंटू बन गया जेंटलमॅन या सिरियलमध्येही काम केले होते. त्यानंतर तो युट्युबवर प्रसिद्ध होऊ लागला. तो आज एकसोबत चार प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो.

त्याच्या खानदेशी मुव्हीज या युट्युब चॅनलला २३ मिलियनपेक्षा जास्त सब्सक्रायबर आहे. आता तो युट्युबवर प्रसिद्ध कलाकार झाला असून तो लाखोंची कमाई करत आहे.

१७ ऑगस्ट २०१९ मध्ये त्याच्याच उंची इतक्या मुलीसोबत लग्न झाले होते. त्यांची जोडीही दिसायला सुंदर दिसते. त्यांचे अनेक फोटोही सोशल मिडीयावर येत असतात. छोटू दादा हा मुर्ती लहान पण किर्ती महान याचे उत्तम उदाहरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.