गरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री; एकदा वाचाच…

0

 

आज जगात अशा अनेक महिला आहे ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महिल्यांच्या यादीत फिनलँडच्या तरुण प्रधानमंत्री सना मारिन यांचेही नाव आहे. त्या जगातल्या सर्वात तरुण प्रधानमंत्री आहे.

गेल्यावर्षी सना मरिन सर्वात तरुण प्रधानमंत्री बनल्या. त्यांचे वय फक्त ३४ वर्षे आहे. २२ वर्षे वय असतानाच सना राजकारणात आल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत परभाव ते थेट देशाचे पंतप्रधानपद अशी त्यांची कारकीर्द आहे.

सना मारिन यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९८५ मध्ये फिनलँड मध्ये झाला होता. वडीलांना दारूचे व्यसन असल्याने सना आणि तिची आई दुसरीकडे राहत होत्या. सनाचे पालनपोषण तिची आई आणि आईच्या प्रियकराने केले. त्यांची आर्थिक स्थिती गरिबीचीच होती.

पुढे जेव्हा सनाच्या आईचे निधन झाले, तेव्हा ती अनाथाश्रमात राहू लागली. वय कमी असतानाच तिने नोकरी शोधण्याचा सुरुवात केली. आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याआधी त्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला होता.

१५ वर्षाची असताना सना यांनी एका बेकरीत नोकरी केली. शाळेत असताना त्या घरोघरी जाऊन मासिके वाटायच्या. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कॅशियर म्हणून काम करण्यास सुरवात केली.

२०१५ मध्ये पहिल्यांदा संसद सदस्य म्हणून सना यांची निवड झाली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत सना पुन्हा निवडून आल्या. तेव्हा त्या परिवहन आणि संचार मंत्री झाल्या.

तत्कालीन प्रधानमंत्री अँटी रीने यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता कारण त्यांच्यातल्या एका पक्षाने रीने यांना दिलेले समर्थन मागे घेतले होते.

रीने यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिथल्या सामाजिक लोकतांत्रिक पार्टीने बाकीच्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. पाच पक्षांच्या या गठबंधणाच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी सना मारीन यांची निवड झाली.

मारिन यांच्या निर्णयाचे नेहमीच कौतुक करण्यात आलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दिवसातून ४ दिवस आणि दिवसाला सहा तास काम झाले पाहिजे, हेच पुढे जगात ट्रेंड करेल.

मारिन सरकारने समानता योजना सुरू केली आहे, ज्यात पालकांना काळजी घेणे, समान काळजीसाठी प्रोत्साहन, घरगुती हिंसाचार सोडविणे, वेतनात लैंगिक असमानता संपवणे आणि गरीब आणि स्थलांतरित कुटुंबांत वाढलेल्या मुलांना शिक्षण देण्याची आणि त्यांच्या हक्कांची मांडणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटात मारीन सरकारच्या निर्णयांचे कौतुक झाले आहे. सना मारिन यांनी आपल्या आत्मविश्वास आणि जिद्दीने जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सना मारिन यांची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.