मानलं गड्या! १२ वी पास तरुणाने तयार केला रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर; नांगरासह करतो सगळी कामं

0

 

जगभरात ड्रायव्हरलेस गाड्यांवर संशोधन सुरू आहे. असे असताना भारतातल्या एका तरुणाने आपल्या वडिलांसाठी चक्क रिमोटवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे. हा तरुण १२ वी पास आहे.

या तरुणाचे नाव योगेश नागर असून तो राजस्थानमधल्या बारन जिल्ह्यामध्ये राहतो. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या योगेशला आपल्या वडिलांचे कष्ट बघवत नसल्याने त्याला रिमोटवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची कल्पना सुचली होती.

रिमोटवर चालणाऱ्या या ट्रॅक्टरने शेतीतील सगळीच कामे करता येतात. रिमोटच्या साहाय्याने हे ट्रॅक्टर शेत नांगरण्यासह अनेक वेगवेगळी कामे करते. विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर १ किलोमीटरच्या अंतरावरून पण कंट्रोल करता येतो.

तसेच योगेशने या ट्रॅक्टर पुढे सेन्सर लावल्याने ट्रॅक्टर पूढे काही आल्यास ट्रॅक्टर ऑटोमॅटिक ब्रेक लावतो. त्याने हा ट्रॅक्टर २०१७ सालीचा बनवला होता पण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे ट्रॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

२०१७ मध्ये योगेशचे वय १९ होते. तेव्हा त्याने १२ वी पास झाल्यानंतर बीएससीसाठी प्रवेश घेतला होता, तेव्हा त्याने हे रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर तयार केले होते.

योगेशच्या वडिलांचे नाव रामबाबू नागर आहे. ट्रॅक्टर चालवताना बऱ्याचदा त्यांच्या पोटात दुखायचे, वडिलांची अशी स्थिती योगेशला बघवत जात नव्हती. तेव्हा त्याला ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर तयार करता येईल का असा विचार केला.

त्याने याबाबत आपल्या वडिलांना सांगितले पण या गोष्टीवर वडिलांचा विश्वास बसत नव्हता. पण आपल्या मुलाने सांगितल्यामुळे त्यांनी त्याला २ हजार रुपये दिले. त्यावेळी योगेशने गरजेचे सामान आणले आणि रिमोटवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे सॅम्पल बनवले, तेव्हा वडिलांना ते वडिलांना खूप आवडले.

आपले मुलाचे रिमोटवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज काढून ५० हजार रुपये जमवले. त्या पैशांनी योगेशने गरजेचे सामान आणले आणि प्रत्यक्षात रिमोटवर चालणारे ट्रॅक्टर योगेशन बनवले.

Leave A Reply

Your email address will not be published.