पिवळ्या टरबुजांची शेती करुन हा तरुण कमवतोय मोक्कार पैसे; वाचा कसे…

0

 

आजकाल अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्यांनी केलेल्या या प्रयोगातून ते लाखो रुपये कमवत असतात. आजची गोष्टही अशाच एका शेतकऱ्याची आहे.

कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव बसवराज असे आहे. त्याने त्याच्या शेतात पिवळे टरबुजाचे उत्पादन घेतले आहे, त्यामुळे बसवराज पिवळे टरबुज उगवणारा पहिला शेतकरी बनला आहे. या शेतीतून बसवराज लाखोंची कमाई करत आहे.

देशात मोठ्याप्रमाणात पारंपारिक शेती केली जाते, पण बसवराजने आपल्या शेतात वेगळा प्रयोग करुन पाहत पिवळ्या टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. बसवराज हा कलबुर्गी जिल्ह्याच्या कोरहळ्ळी गावात राहतो.

त्याने केलेल्या या पिवळ्या कलिंगडाच्या शेतीला यश आले असून हे टरबुज लाल टरबुरापेक्षाही गोड असल्याचे त्याने म्हटले आहे. ही शेती करण्यासाठी त्याने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

आपण पीकामध्ये नेहमीच विविधता आणली पाहिजे, असे त्याने म्हटल आहे. गेल्या १० वर्षांपासून लालरंगाच्या टरबुजाची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याला युट्युबवरुन पिवळ्या टरबुजाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने ही पिवळ्या टरबुजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

त्याने या टरबुजाची लागवड करण्यासाठी जर्मनीतून बियाणे मागवली, तसेच या शेतीची पुर्ण माहिती घेऊन त्याने ही शेती करण्यास सुरुवात केली. त्याने ही शेती करण्यासाठी २ लाखांची गुंतवणूक करुन ३ लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

पिवळे टरबुजांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अफ्रिकेत घेतले जाते. कुलबर्गी जिल्ह्यात हे टरबुजाचे घेण्यासाठी चांगले तापमान आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पिवळ्या टरबुजाचे चांगले उत्पादन मिळते.

पिवळे टरबुज हे जगभरात खुप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. माणसाच्या शरिरासाठी हे खुप फायद्याचे असल्याचे म्हटले जाते. बाजारात लाल टरबुजपेक्षा पिवळ्या टरबुजांची मागणी जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.