…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”

0

माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची आज १०८ वी जयंती. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सह्याद्रीएवढे आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते भारताचे उपपंतप्रधान हा त्यांचा राजकीय प्रवास होता.

आज आम्ही त्यांचा एक किस्सा सांगणार आहोत ज्यामुळे लोकांना त्यांची किंमत कळली आणि ही म्हण प्रचलित झाली की हिमालयाच्या मदतील सह्याद्री धावून आला. तर झाले असे होते की, १९६२ साली चीनने भारतावर अचानक आक्रमण केले होते.

त्यावेळी भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नेहरूंच्या विनंतीवरून यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यांनी पुढील चार वर्षे हे पद स्विकारले होते.

त्याचे लोकांनी असे वर्णन केले की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. १९६५ च्या भारतीय-पाकिस्तान युद्धानंतर संपुर्ण भारताला यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची झलक दिसली होती. यशवंतराव चव्हाणांकडे एक समर्थ नेता म्हणून लोक पाहू लागले होते.

१९६५ मध्ये भारतीय भुमीत पाकिस्तानी सैन्य घुसले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात भारतीय लष्कराने हवाई दलाचा वापर केला होता. त्यावेळी हवाई हल्ल्याचा वापर करण्याचा प्रस्ताव संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाठवला होता.

त्याला केवळ पाच मिनिटांत यशवंतराव चव्हाण यांनी होकार दिला होता. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत भारतीय हवाईदलाची २२ जिगरबाज लढाई विमाने आभाळात झेपावली आणि भारतीय आर्मीच्या जवानांना संरक्षण देत त्यांनी बॉम्बचा वर्षाव सुरू केला.

आर्मीच्या आणि एअरफोर्सच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची पिछेहाट झाली. हे यश भारतीय सैन्य आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण होते.

त्यानंतर अशी म्हण प्रचलित झाली की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. असे म्हणतात की त्यांनी संरक्षणमंत्री असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि त्यांच्या निर्णयांचा पुढे खुप फायदा झाला पण यशवंतरावांना म्हणेल तसा सन्मान मिळाला नाही.

महाराष्ट्रातून आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि शरद पवार या तिघांनीही संरक्षणमंत्रीपद सांभाळले आहे आणि हे तिघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेले आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही मराठी होते. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा आणि जर लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.