कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा

0

२५ वर्षाचा यशराज हा एक इंजीनिअर आहे. तो औरंगाबादचा रहिवासी आहे. त्याच्या गाण्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. त्याची गाणे बनवण्याची पद्धत खुपच हटके असल्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.

यशराज तेव्हा चर्चेत आला तेव्हा त्याने २०२० मध्ये त्याने साथ निभाना साथिया या मालिकेतील डायलॉगवर एक व्हिडीओ बनवला होता. तो डायलॉग होता रसोडे में कौन था. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाले होते.

त्याने पुढे खुप यासांरख्या व्हिडीओज तयार केल्या. त्याच्या पुढे अनेक व्हिडीओज व्हायरल झाल्या. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींनी त्याच्या अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. सगळ्यात जास्त त्याचे रसोडे में कौन था हे गाणे फेमस झाले होते.

यशराजने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला त्याने सांगितले की, जेव्हा तो ३ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला एक छोटा म्युझिकल कीबोर्ड घेतला होता. तो किबोर्ड घेऊन यशराज घरात किंवा घराबाहेर हिंडायचा.

प्रत्येक ठिकाणी जाताना त्याच्याकडे तो किबोर्ड असायचा. तेथून त्याला संगीताची आवड निर्माण झाली. पुढे तो मोठा झाला आणि त्याने इंजीनिअरींगचे शिक्षण पुर्ण केले आणि त्यासोबत तो म्युझिकही शिकला.

युट्यूबवर तो म्युझिक बनवायला शिकला आणि नवनवीन म्युझिकची साधने वाजवायला शिकला. त्याने नंतर वेगवेगळी गाणे बनवून युट्यूबवर टाकायला सुरूवात केली. त्यानंतर त्याने जिंगल आणि इतर संगीत बनवायला सुरूवात केली.

इंजीनिअर झाल्यानंतर त्याने आपल्या घराच्या बेसमेंटमध्ये गाणे बनवायला सुरूवात केली. त्यांना त्यातून कधी कमाई होत असे तर कधी कधी काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या आईवडिलांना कधीच सांगितले नाही की तो काय करतो आहे.

त्याने अनेक व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकले पण त्याला चांगला प्रतिसाद येत नव्हता. १० हजार फॉलोवर्स जमावायला त्यांना खुप कष्ट घ्यावे लागले होते. एकदा त्याने पाहिले की साथ निभाना साथियामधील रसोडे मै कौन था हा डायलॉग खुप फेमस झाला आहे.

या डायलॉगला खुप ट्रोल केले जात होते. यावरून त्याला आयडिया सुचली की आपण याच्यावरून गाणे बनवू शकतो. त्याने गाणे बनवले आणि ते युट्यूबवर अपलोड करून तो झोपी गेला. त्याने फोनही स्वीच ऑफ केला होता.

दुसऱ्या दिवशी त्याच्या फोनवर अनेक मेसेज आणि फोन येऊ लागले. अनेक सेलिब्रिटींनी त्याला मेसेज केले होते. एवढंच काय शिल्पा शेट्टी, स्मृती इरानी, बादशाह आणि स्वता कोकिलाबेन म्हणजे रूपल पटेल यांनीसुद्धा यशराज मुखाते याची खुप प्रशंसा केली.

सगळ्या न्युज चॅनलवर त्याचाच व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. हा व्हिडीओ कोणी बनवला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यांना अनेक टिव्ही शोमध्ये बोलविण्यात आले. संगीतकार विशाल भारद्वाजनेही त्याच्यासोबत गाणे रेकॉर्ड केले.

यशराजला विश्वासच बसत नव्हता की त्याचे स्वप्न साकार झाले आहे. सध्या तो सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या मीम्सचे गाणे बनवणारा किंग बनला आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.