१०० वर्षांपुर्वी मुंबईमध्ये राहणाऱ्या लेखकाने लिहीली होती मोगली, बल्लू आणि बगिराची गोष्ट

0

मोगली, बल्लू आणि बगिरा ही मुलांची आवडती पात्रं शतकानुशतके पूर्वी तयार केली गेली होती. बॉम्बेमध्ये जन्मलेले लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी १८९४ मध्ये द जंगल बुक लिहिले. या कथेवर बर्‍याच टीव्ही मालिका, चित्रपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपट बनविले गेले आहेत.

त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनाबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी बॉम्बे, ब्रिटीश काळात प्रोफेसर जॉन लॉकवुड किपलिंग यांच्या घरी झाला.

रुडयार्ड यांनी त्यांचे बालपण पाच वर्षे भारतात घालवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंडला अभ्यासासाठी पाठविण्यात आले. १८८२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी रुडयार्ड मुंबईला परतले. यावेळी त्यांनी काही वर्तमानपत्रांत काम करून आपली लेखनशैली बळकट केली.

इंग्लंडमध्ये शिकत असताना रुडयार्ड किपलिंग होलोय कुटुंबासमवेत राहत होते. होलोय कुटुंबातील प्रमुख महिला मिस होलोय रुडयार्डवर प्रेम करत नव्हत्या. त्या रूडयार्डचा खुप तिरस्कार करायच्या. त्यानंतर रूडयार्ड हे एकटेस पडले आणि पुस्तकांचा मित्र बनले.

नंतर, त्यांनी आठवणींना त्यांच्या शब्दात उतरावयला सुरूवात केली. बालपणात त्यांना झालेले त्रास त्यांच्या कथेतून आणि त्यांच्या पुस्तकांतून, लेखनातही जाणवतात. द जंगल बुक लिहिण्यापूर्वी रुडयार्ड किपलिंग यांनी बर्‍याच लहान कथा आणि कविता लिहिल्या होत्या.

१८९४ मध्ये त्यांनी द जंगल बुक लिहिले. जंगल बुकला आज गेल्या एका शतकापेक्षा जास्त काळ लोटला आहे पण आजही जंगल बुकची कहाणी आणि मोगली, बल्लू आणि बगिरा यांची मैत्री लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे.

जंगल बुकच्या टीव्ही मालिकेचे शीर्षकगीत, ‘जंगल जंगल पता चला है’ हे आजही खुप लोकप्रिय आहे. रुडयार्ड किपलिंग यांनी अनेक कादंबरी आणि लघुकथा तसेच पुस्तके लिहिली आहेत. जरी त्यांनी अनेक देशांत प्रवास केला असला तरी त्यांच्या लिहीण्यामध्ये भारतीय शैली सर्वात जास्त दिसते.

रुडयार्ड किपलिंग यांना साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व योगदानाबद्दल १९०७ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. नोबेल मिळवणारा ते जगातील सातवे साहित्यिक होते. १८ जानेवारी १९३६ रोजी रुडयार्ड किपलिंग यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.

आजही जंगल बुकच्या माध्यमातून हे आपल्सासोबत जिवंत आहेत. आजही अनेक लहान मुलांचे आवडचे कार्टुन जंगल बुक आहे. मोठी माणसेही हे कार्टुन आवडीने पाहतात. नुकताच त्याचा एक चित्रपटही आला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.