जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी नाहीच; ‘ही’ १० लोक आहेत सर्वात श्रीमंत

0

 

आज या जगात काही असे श्रीमंत लोक असे आहे, जे सध्या अर्धे जग आपल्या खिशात घेऊन हिंडतात. त्यांच्याकडे सध्या इतकी संपत्ती आहे की, ते अर्धे जग विकत घेऊ शकतात. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लुमबर्ग बिलिनियर इंडेक्स यांनी जगातील टॉप टेन श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे.

१.जेफ बेजोस- जगातील सर्वात श्रीमंत माणूस

जेफ बेजोस हे ऍमेझॉन कंपनीचे मालक आहे. त्यांनी आपल्या नेटवर्थमध्ये ७७ अरब डॉलरचा ऍड ऑन केला आहे. जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना संकटात त्यांच्या व्यवसायात चांगलीच वाढ होताना दिसून आली आहे. या काळात त्यांची संपत्ती २०० अरब डॉलरपेक्षा जास्त झाली होती. सध्या जेफ यांच्याकडे १९२ अरब डॉलर संपत्ती आहे.

२.एलन मस्क- जगातील दुसरा श्रीमंत माणूस

एलन मस्क यांच्यासाठी वर्ष खुप खास होते. ब्लुमबर्ग बिलिनियर इंडेक्स यांच्या अहवालानुसार त्यांनी १३० अरब डॉलरची कमाई त्यांनी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. सध्या एलन मस्क यांच्याकडे १६० अरब डॉलर संपत्ती आहे.

३ बिल गेट्स-

बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहे. सध्या त्यांच्याकडे १२८ बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. या संपत्तीमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

४ बर्नार्ड अरनॉल्ट-


बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्सचे प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. ते लग्जरी गुड्स कंपनी एलवीएमएच (लुई विटन मोएत हेनेसी) के चेयरमैन व सीईओ आहे. त्यांची संपत्ती सध्या १११ बिलीयन डॉलर इतकी आहे. ते सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.

५ मार्क जुकरबर्ग-


सोशल मीडियाचे किंग म्हणून ओळखले जाणारे आणि फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग हे श्रीमंत लोकांच्या यादीत पाचव्या क्रंमाकावर आहे. कोरोनाच्या काळात त्यांचा २७ अरब डॉलरचा फायदा झाला आहे. त्यांची संपत्ती १०५ अरब डॉलर इतकी आहे.

६ वॉरेन बफेट-


वॉरेन बफेट हे एक मात्र असे श्रीमंत व्यक्ती आहे, ज्यांचे कोरोना संकटात प्रचंड नुकसान तरी ते त्यांनी श्रीमंत लोकांच्या यादीत आपले नाव काम ठेवले आहे.  ब्लुमबर्ग बिलिनियर इंडेक्स यांच्या अहवालानुसार त्यांची सध्याची संपत्ती ८६.३ बिलियन डॉलर इतकी आहे. श्रीमंत लोकांच्या यादीत वॉरेन बफेट सहाव्या स्थानी आहे.

७ लेरी पेज-


लेरी पेज हे युएस कॉम्प्युटर साइंटिस्ट आणि उद्योगपती आहे. कोरोच्या संकटकाळात त्यांना १९ बिलियन डॉलरचा त्यांना फायदा झाला आहे. सध्या त्यांची संपत्ती ८३.३ इतके आहे. श्रीमंत लोकांच्या यादीत लेरी पेज सातव्या स्थानी आहे.

८ स्टीव बाल्मर-


अमेरिकेचे उद्योगपती आणि गुंतवणूकदार स्टीव बाल्मर  श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी त्यांच्या संपत्तीत २३ बिलियन डॉलरने  वाढ झाली आहे. सध्या त्यांची संपत्ती ८१.२ बिलियन डॉलर इतकी आहे.

९ सर्गेई ब्रिन-


गुगलचे संस्थापक  सर्गेई ब्रिन यांनाही गेल्यावर्षी त्यांच्या चांगलाच फायदा झाला आहे. त्यांना १८ बिलियन डॉलरचा फायदा झाला आहे. ८०.७ बिलियन डॉलरच्या संपत्तीसह ते श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव नवव्या स्थानावर आहे.

१० लेरी एलिसन-


लेरी एलिसन यांच्या संपत्तीत कोरोना काळात २० बिलियन डॉलरने वाढली आहे. सध्या त्यांच्याकडे ७९.२ बिलियन डॉलर असून ते श्रीमंत लोकांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.