३६ वर्षे झाली तरी सांगलीच्या या पठ्याचा विक्रम आजही कोणालाच मोडता आला नाही

0

कोरोनाच्या काळात अनेक लोकांना व्यायामाचे महत्व पटले. बाहेर गाडीवर फिरायाला बंदी होती मात्र सायकलिंगसाठी मात्र मुभा देण्यात आली होती. त्यामुळे या काळात सायकलिंगचा ट्रेंड वाढला.

सायकलचीही विक्री वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन स्पर्धेतही भारतीय लोकांनी आपला ठसा उमटवला आहे आणि तो ही सायकलिंगमध्ये. पण तुम्हाला माहित आहे का की, सांगलीतील दीपक लेले यांनी १९८४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी न्युयॉर्क ते लॉस एंजिलिस असा ८ हजार किलोमीटरचा पल्ला सायकलवर पार केला होता.

पण ही साधीसुधी सायकल नव्हती. त्यांनी हा प्रवास सर्कशीत दिसते तशी एकचाकी सायकलवर पार केला होता. त्यानंतर त्यांनी सांगली ते दिल्ली असा १६६० किलोमीटरचा प्रवास १९८२ मध्येही केला होता.

हा विक्रम आजही कोणीच मोडला नाही. त्यांचा हा विक्रम अनेक लोकांनी मोडण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. अलिकडच्या काळात आयर्नमॅन सारख्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक लोक तयारी करत आहेत त्यांनी दीपक लेले यांचा आदर्श घ्यायला हवा.

आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील व्यावसायिक स्वप्नील कुंभारकर हे एकटेच फुल आयर्नमॅन झाले आहेत. सांगलीमध्ये सायकल चालवणाऱ्यांची कमी नाही. किशोरवयीन वयापासून ते ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेक सांगलीतील लोक सायकलिंग करताना आपल्याला दिसतील.

भारतातील अनेक राज्यातील लोक आता ऑनलाईन नोंदणी करून सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. विविध ठिकाणी ५०, १००, २००, ३००, ५०० किलोमीटर अंतराच्या स्पर्धा सागंलीकरांनी पुर्ण केल्या आहेत.

त्यात राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पॉडिचेरी, हरियाणा, पंजाब अशा ठिकाणाहून लोक सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी येत असतात. स्पर्धांचे वैशिष्ट्य असे असते की या स्पर्धांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

कोरोनाची धास्ती घेऊन आता लोक आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. तसेच पेट्रोलचे भाव वाढलेले असताना अनेक लोक पैसै वाचविण्यासाठी सायकलींचा वापर करू लागले आहेत. आता नवनवीन इलेक्ट्रिक सायकली बाजारात येऊ लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.