नाद खुळा! शाळेत न जाणाऱ्या ७ वर्षाच्या चिमुकल्याने केली मायक्रोसॉफ्टची टेक्निकल परीक्षा पास

0

 

 

असे म्हणतात माणूस सगळ्यात हुशार प्राणी आहे. तसेच त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेला कोणतीही मर्यादा नाही, हे आता पून्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता एका ७ वर्षाच्या चिमुकल्याने मायक्रोसॉफ्टची टेक्निकल परीक्षा पास केली आहे.

ओडिशामध्ये राहणाऱ्या या ७ वर्षीय मुलाचे नाव व्यंकट रमन पटनायक असे आहे. तो सध्या तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे. त्याने इतक्या कमी वयात मायक्रोसॉफ्ट टेक्निकल असोसिएटची परीक्षा पास केली आहे. त्यामुळे देशभरात त्याचे कौतूक केले जात आहे.

व्यंकट आपल्या कुटुंबासोबत ओडिशाच्या बलांगीर भागात राहतो, त्याच्या वडिलांचे नाव कुलदिप पटनायक असे आहे. व्यंकटला देशभरात वंडर किड म्हणून सुद्धा ओळखले जाते.

तिसऱ्या इयत्तेत शिकणारा व्यंकट शाळेत जात नाही, तो घरुनच होम स्कुलिंग करतो. व्यंकटने आपल्या या यशाचे पुर्ण श्रेय वडिलांनाच दिले आहे. त्याचे वडिलच त्याचे मार्गदर्शक आहे.

व्यंकटने जावा, जावास्क्रिप्ट, पायशन, एचटीएमएल, सीएसएस, आणि डाटाबेस एडमिनिस्ट्रेशन फंडामेंटल्समध्ये प्रोग्रामिंग करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची ही परीक्षा पास केली आहे.

व्यंकटने मार्च २०१९ मध्ये व्हाईट हॅट जुनियर जॉईन केली होती. व्यंकटने आतपर्यंत १६० क्लासेस पुर्ण केले आहे. त्याला पहिल्यापासूनच कॉडिंगमध्ये इंट्रेस्ट होता. कोडिंगशिवाय त्याला अंतरिक्ष विज्ञान, रुबिक क्युब, कॅरम, क्रिकेट आणि सायकलिंगमध्येही इंट्रेस्ट आहे.

व्यंकट गेल्या सहा महिन्यापासून मायक्रोसॉफ्ट टेक्निकल असोसिएट या परीक्षेची तयारी करत होता. हि परीक्षा पास करण्यासाठी आणि कोडींगमध्ये स्किल्स डेव्हलप करण्यासाठी त्याला सहा महिने इतका कालावधी लागला आहे.व्यंकट शिकण्यासाठी रोज दिवसातून १० ते १२ तासांचा वेळ देतो.

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जे लोक करियर करण्यासाठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्ट टेक्निकल असोसिएट हा एक मान्यता प्राप्त कोर्स आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.