पती, दीर आणि सासऱ्याने आत्महत्या केल्यानंतर एकटीच सांभाळतेय २९ एकर शेती

0
अकोला | आज देशभरात सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालेले असले तरी अजूनही काही लोक पुरुषप्रधान संस्कृतीने जगात असतात, त्यामुळे स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी लढावे लागते. तसेच आपले जीवन नेहमीच कष्टात दुःखात जगावे लागते. अशात जर एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर त्या महिलेला समाज चुकीच्या पद्धतीने बघतो बोलतो, त्यामुळे त्या स्त्रीला जगणे अजून कठीण होऊन जाते. अशा परिस्थिती काही महिला खूप भक्कम असतात. याचेच एक उदाहरण आहे ते म्हणजे ज्योती देशमुख. विदर्भातल्या अकोल्यातील २५ किलोमीटर दूर असणाऱ्या कट्यार गावात ज्योती देशमुख राहतात. आता त्या एकट्याच २९ एकर जमीनवर शेती करत आहे. शेतीने त्यांना खूप काही दिल्याचे ज्योती म्हणतात. ज्योती यांच्या घरात पती, सासरे, आणि दीर यांनी तिघांनी आत्महत्या केल्या, तिघेही शेतकरीच होते. त्यानंतर ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पण बाईच्या जातीला शेती करणे शोभते का? असे लोकांकडून तिला बोलले जाऊ लागले. शेतजमिनीला रोड लागून असल्याने अनेक लोकांनी ज्योती यांना जमीन विकण्याचा सल्ला दिला. मात्र ज्योती यांच्या लहान मुलाने  जमीन विकली की पून्हा घेता येणार नाही, असे म्हंटले तेव्हा ज्योती यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेरी करताना ज्योती यांना अनेक अडचणी आल्या. कुटुंबात कोणीच पुरुष नसल्याने गावातील लोक त्यांना उतरून पातरुन बोलायला लागले. त्यामुळे ज्योती यांच्या मनातही आत्महत्या करण्याचा विचार येत होते, पण त्यानंतर ज्योती यांच्यासमोर त्यांच्या मुलाचा चेहरा यायचा. ज्योती यांना शेतीची कामे येत नव्हती, पण २००७ मध्ये पतीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी स्वतः सगळी कामे शिकली. निदणे, खुरपणे, बैलगाडी चालवणे सगळे स्वतःच शिकल्या इतकेच काय तर त्यांनी ट्रॅक्टर चालवणेही शिकले. शेतीने ज्योती यांना खूप काही दिले. घराचे बांधकाम, शेतात बोरवेल, ट्रॅक्टर घेतले, मुलाला इंजिनिअर केले. सध्या तो पुण्यातील एका कंपनीत काम करत आहे. ट्रॅक्टर घेण्यामागेही एक कारण होते आणि ज्योती आपल्याला ते अभिमानाने सांगतात. एकदा त्यांना शेतीत बियाणे पेरायची होती, पण ट्रॅक्टरवाला काही लवकर येत नव्हता, ज्योती यांनी सकाळी ७ वाजेपासून तयारी केली होती, पण तो रात्री आला आणि त्याने बियाणे पेरली. जेव्हा पीक आले तेव्हा बऱ्याच ठिकाणी बियाणे पडले नसल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी ट्रॅक्टरवाल्याला जाब विचारला. तेव्हा ट्रॅक्टरवाला बोलला की इतकेच वाटते तर तुम्हीच ट्रॅक्टर घ्या आणि पेरणी करा, यावर ज्योती यांनी पाच वर्षात ट्रॅक्टर घेऊन दाखवील, असे स्वतःशीच ठरवले आणि पाच वर्षात ट्रॅक्टर घेऊन दाखवला. बोरवेलही त्यांनी घेतली कारण कट्यार गाव खारपाण पट्ट्यात येते. या गावातील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे त्यांनी बोरवेल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्योती यांना बोरवेलचा चांगलाच फायदा झाला आहे. लोक मला टोमणे देत होते, पण मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष दिले. मी माझ्याकडे शेताकडे लक्ष दिले. आपण जर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असाल, तर घरात बसाल तरी लोक टोमणे देतात आणि नाही बसले तरी टोमणे देतील. दुसऱ्याचे टोमणे ऐकत बसण्यापेक्षा स्वतः कष्ट करून जगण्यात काय हरकत, असा सल्लाही ज्योती देतात.
Leave A Reply

Your email address will not be published.