१० हजारात सुरू केला व्यवसाय, मैत्रिणीनेही दिली साथ, आता कमावतेय करोडोंच्या घरात

0

आज आम्ही तुम्हाला अशा स्त्रीची यशोगाथा सांगणार आहोत जिने हे सिद्ध करून दाखवले आहे की तुम्ही कोठे जन्माला आलात? तुमच्याकडे किती पैसै आहेत? यावर तुमचं यश अवलंबून नसतं.

केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर बंगळुरू येथे राहणाऱ्या एका महिलेने गगणाला भरारी घेतली आहे. चालू नोकरीला लाथ मारून त्यांनी व्यवसाय उतरण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा प्रवास वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

नीला अदप्पा असे त्या महिलेचे नाव आहे. नीता यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केली आणि आज त्यांच्या वर्षांचा टर्नोव्हर कोटींच्या घरात आहे आणि त्या महिन्याला लाखो रूपये कमवत आहेत.

त्यांनी केवळ १० हजारात व्यवसाय सुरू केला होता व आज त्या कोट्यावधींचा व्यवसाय करत आहेत. नीता यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांचे वडील एक हर्बल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर होते.

नीता यांनी मुंबईतच शिक्षण घेतले आहे. त्यांनी फार्मसीमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली होती. त्यानंतर त्यांच्यासमोर तीन पर्याय होते ते म्हणजे परदेशात शिक्षणासाठी जावं किंवा नोकरी करावी किंवा पुढचे शिक्षण घ्यावं.

पण त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करताना त्यांचे मन तिथे रमत नव्हते आणि फक्त ६ महिने त्यांनी नोकरी केली आणि नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथे स्वताचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

१९९५ मध्ये त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात स्त्रियांना व्यवसाय करण्याच्या संधी खुप कमी होत्या. तरीही त्यांनी अनेक कल्पना वापरून व्यवसाय वाढवला आणि प्रकृती हर्बल्स नावाने कंपनी सुरू केली.

यावेळी त्यांना त्यांच्या कॉलेजची मैत्रिण अनिशा देसाई हिने खुप साथ दिली. दोघींनी मिळून हेअर केअर, स्कीन प्रॉडक्टसवर खुप संशोधन करून दहा हजार रूपये गुंतवून व्यवसायाला सुरूवात केली होती.

त्यांनी सुरूवातील फक्त हॉटेल्सला टार्गेट केले होते. सुरूवातीला त्यांना बंगळुरच्या छोट्या हॉटेल्समधून ऑर्डर मिळू लागल्या. त्यानंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेल्सला टार्गेट करण्यास सुरूवात केली. तिथूनही त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे त्यांचा बिझनेस खुप वाढला. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये रिटेल सेक्टरमध्ये पाऊल ठेवले. १८० ते ३०० रूपयांपर्यंत त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले. आता त्यांची उत्पादने ऑनलाईनही उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.