..आणि तिने बनवले वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस, आता त्यातूनच कमावले तब्बल ६० लाख

0

आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी आज एका आयडियातून बक्कळ पैसा कमवत आहे. त्या महिलेचे नाव आहे शिवांगी जैन. त्या भोपाळ येथील रहिवासी आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ देहरादून येथून ऑटोमोटिव्ह डिझाइनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

त्यांनी नंतर ५ वर्षे त्यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया आणि एल एँड टी ग्रुपसारख्या कंपन्यांमध्ये काम केले. पण त्यांचे तिथे मन लागत नव्हते म्हणून त्यांनी वर्ष २०१८ मध्ये नोकरी सोडली आणि त्या भोपाळमध्ये परत आल्या.

त्याच वर्षी शिवांगी यांना एक भन्नाट कल्पना सुचली. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांनी आपला स्टार्टअप एमपीप्सच्या माध्यमातून ट्रॅक एव्हलॉयव्ह नावाचे ट्रॅकिंग सोल्यूशन सॉफ्टवेअर तयार केले. तीन वर्षांत त्यांनी अनेक प्रकारच्या वाहनांमध्ये ट्रॅकिंग डिवाइस इंस्टॉल केले आहेत.

यातून त्यांनी आतापर्यंत ६० लाखांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. शिवांगी या एकत्र कुंटुबात राहतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही व्यवसाय करत होता. शिवांगी यांनी सांगितले की, एकदा मावशीचा मुलाला शाळेतून यायला उशीर झाला.

त्याच्या बसला यायला उशीर झाला होता. काकू रोज त्याला बस स्टॉपवर घेऊन जायचे पण त्यादिवशी बस वेळेवर आली नाही तर घरात गोंधळ उडाला होता. शाळेत फोन केला तर बस असे कळाले की शाळेतून बस कधीच निघाली होती.

या सगळ्यामध्ये माझी काकू रडू लागली. जवळपास दोन तासानंतर बस आली तेव्हा कळाले की ब्रेकडाऊन झाले होते. त्याच दिवशी मला स्टार्टअप करण्याचे सुचले. मला कळले की पालक त्यांच्या मुलाबद्दल किती अस्वस्थ आहेत.

आपला मुलगा कोठे आहे हे जाणण्याचा हक्क पालकांना आहे. त्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. मी ऑटोमोटिव्ह डिझाईनचा अभ्यास केला असल्याने मला ट्रॅकिंग सिस्टमचा विचार माझ्या डोक्यात आला.

२०१८ मध्ये मी ट्रॅक ऑलवेज नावाची कंपनी सुरू केली. आम्ही त्याच्या नावाचे एक ऍप तयार केले. याद्वारे ग्राहकांना ट्रॅकिंग डिव्हाइस दिले जाते. हे डिव्हाईस वाहनात बसविले जाते. यात कार कोणत्या मार्गावर आहे किती किलोमीटर गेली आहे आणि याच ऍपमधून आपण गाडीचे इंजिनही बंद करू शकतो.

स्टार्टअपच्या सुरूवातीला दिवसांबद्दल शिवांगीने सांगितले की, माझ्याकडे त्यावेळी माझ्या टीममध्ये एक टेक्नीशियन आणि मी दोघेच असायचो. मी सेल्सची जबाबदारी घ्यायचे आणि तर तो डिव्हाईसला फिट करायचा.

मग आम्ही लॅपटॉपवरून ऍपला ते डिव्हाईस कनेक्ट करून ग्राहकाला दाखवायचो. ही स्टार्टअप २५ हजारापासून सुरू केली होती. हे माझ्या बचतीचे पैसे होते. या स्टार्टअपची सुरूवात २ लोकांपासून झाली होती.

कोरोनाच्या आधी आमच्याकडे १५ लोक काम करत होते. आता सध्या आमच्याकडे ५ लोकांची टीम आहे. या तीन वर्षात आम्ही १ हजारापेक्षा जास्त डिव्हाईस बसवले आहेत. यातून त्यांनी ६० लाख रूपयांचा व्यवसाय केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.