वडिलांकडून कर्ज घेऊन सुरू केला स्वीट कॉर्नचा व्यवसाय, आज आहे करोडो रुपयांची मालकीण

0

आजकालच्या महिला पुरूषांना मागे टाकत आहेत. अनेक क्षेत्रात आज महिला खुप उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. पण कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकटी अंगात असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्याबद्दल तुम्हाला आधीपासून सगळी माहिती असली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एका स्त्रीची यशोगाथा सांगणार आहोत जिने तीन बाय तीनच्या काऊंटरवरून सुरू केलेला व्यवसायाला तीन हजार स्केअर फुटांवर नेले आहे.

या स्त्रीचे नाव आहे शुंभागिनी सांगळे. आज आम्ही तुम्हाला तिची यशोगाथा सांगणार आहोत. अहमदनगरमध्ये तिचा जन्म झाला होता आणी ती एक आयटी इंजिनीअर आहे. तिचेही स्वप्न होते की तिला आयटी इंजिनीअर बनायचे आहे.

त्यासाठी तिने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. पण शेवटच्या वर्षाला असताना तिचे लग्न झाले. लग्नानंतर तिला वाटत होते की आपण काहीतरी केले पाहिजे. तिला फक्त चुल आणि मुल याच्यातच आपले आयुष्य घालवायचे नव्हते.

तिने नोकरीसाठी अनेक कंपन्यात ऍप्लाय केले पण तिच्या हाती निराशाच आली. मग तिने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आयटी कंपनीत तिला जॉब भेटत नव्हता. तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की जर आपल्याला आयटी कंपनीत नोकरी मिळत नाहिये तर आपण आयटी क्षेत्रात फुट लाईन चालू करू शकतो.

तिने पतीशी चर्चा केली आणि फुड लाईन चालू करण्याचा निर्णय घेतला. जिथे लोक जॉब मागायला जातात तिथे ती कॉन्ट्रॅक्ट मागायला गेली. मग तिने ३ बाय ३ चा स्वीट कॉर्नचा काऊंटर सुरू केला. त्यानंतर तिने खुप कष्ट केले.

सगळे काऊंटर तिने एकटीने सांभाळले. वडिलांकडून पैसै उधार घेतले होते. त्या पैशातून तिने एकाचे १० काऊंटर सुरू केले. त्यानंतर तिने अंड्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा विचार केला. त्यानंतर तिने अनेक पदार्थ बनवायला सुरूवात केली आणि तिला अनेक कंपन्यांचे काम मिळू लागले.

पण केटरींगचे काम सुरू असताना कोरोनाचे संकट आले. पण तिने हार मानली नाही आणि पुन्हा दुसरा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊनमध्ये तिने मनकर्णिका हा कपड्यांचा ब्रॅड सुरू केला. आज ती सात कोटींची मालकीण आहे. एक छोटासा व्यवसाय आज किती मोठा झाला आहे तुम्ही विचारही करू शकत नाही. आज शुभांगी करोडो रूपयांची मालकीण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.