याला म्हणतात आयडियाची कल्पना! पीपीई किटच्या टाकाऊ वस्तूंपासून बनविल्या गाद्या

0

२०२० साल सगळ्यांसाठीच खुप कठीण गेलं. पण अनेकांनी या वर्षाला एक संधी म्हणून पाहिले. संपुर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला होता. या आजारामुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. भारतातदेखील कोरोनाचा पहिला रूग्ण केरळमध्ये सापडला होता.

त्यानंतर ही रुग्णसंख्या वाढतच गेली. आपली आरोग्य व्यवस्था कमी होती आणि आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे रूग्णांवर उपचार करणे अवघड जात होते. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण होते.

त्यामुळे या राज्यात बेडची संख्या अपुरी पडत होती आणि रूग्णसंख्या वाढतच चालली होती. त्यावेळी बेड उपलब्ध करण्यात आले पण त्यावर टाकण्यासाठी गाद्या अपुऱ्या पडत होत्या. मग आता ह्या गाद्या आणायच्या कुठून हा मोठा प्रश्न उभा राहिला होता.

त्यावेळी केरळमधील प्युअर लिवींगच्या मालकीण लक्ष्मी मेनन यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्या कल्पनेने या गाद्यांचा प्रश्न मिटला. आज आम्ही तुम्हाला लक्ष्मी मेनन यांच्याबद्दल सांगणार आहोत.

त्यांची प्युअर लिविंग ही कंपनी पर्यावरणपुरक वस्तु बनवते. याआधीही त्यांनी अनेक पर्यावरणपुरक वस्तू बनवल्या आहेत. लक्ष्मी यांनी कोरोना काळातील परिस्थिती पाहिली आणि काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

मग त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना कळले की पीपीई किट बनवताना जे टाकाऊ सामान उरते त्यातून आपण पर्यावरणपुरक गाद्या बनवू शकतो. लक्ष्मी यांनी सांगितले की फक्त केरळमध्येच त्यावेळी दर दिवसाला २० हजार पी. पी. ई किट बनवले जात होते.

हे पीपीई किट बनविताना अनेक टाकाऊ माल निर्माण होत होता. आणि हा टाकाऊ माल जाळून टाकला जात असे. त्यांनी सर्वात आधी हा माल गोळा करण्यास सुरूवात केली. लक्ष्मी यांनी सांगितले की जर आपण एखादी गादी घ्यायला गेलो तर कमीत कमी ५०० ते ६०० रूपये खर्च होतो.

पण कोरोनाकाळात रूग्णासाठी वापरण्यात येणारी गादी एकदा वापरली की तिचा वापर पुन्हा केला जात नसे. त्यामुळे मी पीपीई किट बनविताना जे टाकाऊ पदार्थ उरायचे त्यातून गाद्या बनवायला सुरूवात केली.

ह्या गाद्या खुप स्वस्तात तयार व्हायच्या आणि त्यासाठी सामानही खुप कमी लागत होते. या गाद्यांना विनले जाते. यासाठी कोणताही दोरा किंवा डिंक लागत नाही. तरीदेखील ह्या गाद्या मजबूत तयार व्हायच्या.

तसेच पीपीई किट वॉटरप्रूफ असते त्यामुळे ह्या गाद्यादेखील वॉटरप्रुफ होत्या. या गाद्यांना साबनाने धुता येत होते आणि त्या वजनानेही हलक्या होत्या व मऊ होत्या. या गाद्यांना शय्याहे नाव देण्यात आले आहे.

या गाद्यांची उंची ६ फूट होती आणि यावर एक व्यक्ती आरामशीर झोपू शकतो. या गाद्या एकदा वापरल्या की त्यांचे निर्जंतुकीकरण करून या गाद्या रस्त्यावर राहणाऱ्या गरीब लोकांना वाटण्यात येतात. कोरोनाकाळात अनेक महिलांचे रोजगार गेले होते त्यांनाही यामुळे रोजगार मिळाला आहे.

अवघ्या ३०० रूपयांत त्यांनी ही गादी उपलब्ध करून दिली. अनेक खाजगी कंपन्या त्यांच्याकडून या गाद्या खरेदी करत आहेत तसेच त्यांनी अनेक सरकारी दवाखान्यांना आणि कोवीड सेंटर्सना मोफत गाद्या दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.