नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप, आता औरंगाबादचा मसाला झाला दमन-दिवला फेमस

0

आयुष्यात जर काही करायचे असेल तर त्यासाठी जिद्द खुप महत्वाची आहे. आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असली पाहिजे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते.

आज आम्ही तुम्हाला अशा एक महिलेबद्दल सांगणार आहोत जिने मसाले विकून यशाचे शिखर गाठले आहे. त्यांनी आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. त्यांना काहीतरी उद्योग करायचा होता.

याच हेतूने त्यांनी औरंगाबाद येथील श्वेता जाधव-वरकड यांनी मसाले बनविण्याचे नवीन स्टार्टअप सुरू केले. त्यांच्या गोडा मसाल्याला मोठी मागणी आहे. आपल्या मराठवाडी पद्धतीने त्यांनी गोडा मसाला बनविला होता.

आता त्यांना थेट दमन-दीव येथून मसाल्याची मागणी येत आहे. गेल्या चार महिन्यात सुरू केलेल्या या गृह उद्योगाने आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून वेगळीच ओळख निर्माण केली आहे. श्वेता जाधव यांनी एमबीए केलं आहे.

त्यानंतर त्यांनी एच आर डिपार्टमेंट मध्ये जॉब केला होता. त्यानंतर त्यांना वाटले की आपण स्वताचे काहीतरी केले पाहिजे. मग त्यांनी मसाल्याचा गृहउद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरूवात लहानापासून केली.

त्यानंतर त्यांनी या व्यवसायाची माहिती गोळा केली. आपल्या शिक्षणाचा, नोकरीचा, अनुभवाचा फायदा घेत त्यांनी सोशल मिडीयावरून मसाल्याची मार्केटिंग करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्या मसाल्याला अनेक ठिकाणांहून मागणी आली.

त्यांनी चार ते पाच महिन्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता त्यांना थेट दमण-दीव येथून मसाल्याची ऑर्डर आली आहे. ही ऑर्डरसुद्धा त्यांना सोशल मिडीयावरून आली आहे.

कुरिअरच्या माध्यमातून हा मसाला दमण-दीवला पाठविण्यात आला आहे. त्यांच्या या व्यवसायातून अनेक महिलांनी प्रेरणा घेतली आहे आणि अनेक महिलांनी मसाले बनविण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.