२ रूपयांचा चिप्सचा व्यवसाय नेला कोट्यावधींच्या घरात, ज्यांनी विरोध केला तेच करतात आता कौतुक

0

अमरावतीच्या एका महिलेने हे दाखवून दिले आहे की जर जिद्द चिकाटी असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो. २ रूपयांचे चिप्स विकण्यापासून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता आज त्यांचा बिझनेस कोट्यावधींच्या घरात पोहोचला आहे.

आज आम्ही तुम्हाला त्यांची यशोगाथा सांगणार आहोत. झारखंडमधील रांची येथील रहिवासी असणाऱ्या निशा सोरेन यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. लग्नानंतर त्या अमरावतीमध्ये स्थायिक झाल्या होत्या.

तिथे काही दिवस त्यांनी एका आभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले. पण त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा होता. पण त्यांना व्यवसाय करण्यासाठी घरच्यांनी प्रचंड विरोध केला होता. या विरोधाकडे त्यांनी लक्ष दिले नाही आणि घरच्या घरीच चिप्स तळून विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.

त्यानंतर त्यांनी घरीच डिस्टील्ड वॉटरचा व्यवसायही त्यांनी सुरू केला. एवढंच नाही तर त्यांनी ७ वर्षांपुर्वी अंजनगाव बारी येथे अडीच एकर शेती घेऊन स्पेशल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली.

या कंपनीद्वारे त्यांनी फर्टिलायझरचं उत्पादन सुरू करण्यास सुरूवात केली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आता या उत्पादनाची विक्री एक नाही दोन नाही तर तब्बल ११ राज्यांत होते. त्यांनी या माध्यमातून शेकडो महिला व पुरूषांना रोजगार मिळवून दिला आहे.

पण त्या इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली. त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आता सगळे लोक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात मग आपण आपला बिझनेस ऑनलाईन नेला पाहिजे.

त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला बिझनेस विकसित केला आणि सोबत प्लॅस्टिक कंटेनर व पेस्टीसाईडचा व्यवसायही सुरू केला. ज्या लोकांनी एकेकाळी निशा यांना उद्योगासाठी विरोध केला होता तेच लोक आज त्यांच्या कामाची तत्परता, जिद्द, चिकाटी आणि यश पाहून अवाक झाले आहेत.

वाईट बोलणारे सगळे लोक लोक आता त्यांचे कौतुक करत आहेत. अशा महिला आज भारताच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अभिमान आहेत. त्यांच्या जिद्दीला एक सलाम तर बनतोच. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.