कॅप्टन कुल धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स ‘थाला’ का म्हणतात?

0

धोनी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमधील एक खेळाडू आहे. सध्या धोनी त्याच्या रांची येथील कैलाशपती फार्म हाऊसमध्ये वेळ घालवत आहे. धोनीला त्याचे रांची येथील फार्म हाऊस खुप आवडते त्यामुळे जेव्हापण धोनी रांचीला जातो तेव्हा तो फार्महाऊसला भेट नक्की देतो.

त्याचे हे फार्म हाऊस ४३ एकरमध्ये पसरलेले आहे. कोरोनाकाळातही धोनीने आपला पुर्णवेळ याच फार्महाऊसमध्ये घालवला. त्याच्या या फार्महाऊसवर अनेक क्रिकेटर येऊन गेले आहेत.

धोनीचे भारतभर काय पुर्ण जगभर खुप फॅन्स आहेत. धोनीला त्याच्या फॅन्सने अनेक नावे पाडली आहेत. जसे की थलायवा, फिनीशर, कॅप्टन कुल आणि थाला. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की धोनीला थाला का म्हणतात?

नक्की या शब्दाचा काय अर्थ आहे? धोनीचे हे नाव खुप फेमस आहे. त्याला सगळीकडे थाला म्हणूनच ओळखतात. धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

दरम्यान, धोनी आपल्याला युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स धोनीला थाला म्हणून ओळखतात. तमिळमध्ये या शब्दाचा अर्थ होतो नेता.

नेता व्यतिरीक्त या शब्दाचा अर्थ होतो बिकट परिस्थितीत लढून लढाई जिंकणारा. याचा अजून एक अर्थ होतो तो म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या साधेपणासाठी ओळखला जातो. धोनीने आपल्या कारकिर्दित चेन्नई सुपर किंग्सला तीनवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली.

आयपीएल २०२१ मध्येसुद्धा धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन असणार आहे. धोनी या वेळेस काय कमाल करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. धोनीकडून यावेळेस त्याच्या फॅन्सला खुप अपेक्षा आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.