जाणून घ्या कोण आहेत, म्यानमारची सत्तापालट करणारे लष्करप्रमुख मिन आंग लाईंग

0

 

 

सोमवारी म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सेना प्रमुख सिनीयर जनरल मिन आंग लाईंग यांच्यावर आहे. सत्तापालट झाल्यानंतर पुर्ण सत्ता त्यांच्याच हाती आली आहे, याबाबत म्यानमारच्या सेनेने जाहीर केले आहे.

म्यानमारच्या राजकारणात नेहमीच सेनेचे वर्चस्व होते. १९६२ मध्ये जेव्हा सत्तापालट झाली त्यानंतर सेनेने ५० वर्षे शासन केले. २००८ ला म्यानमारमध्ये संविधान आणण्यात आले. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्षांना जागा देण्यात आली, मात्र सेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यात आले.

त्यामुळे लोकशाही सरकार असतानाही एखादा कायदा लागू करायचा असेल, तर तो देशात लागू करायचा की नाही याबाबतचा निर्णय सेना घेत असते. आता सत्ता मिन आंग लाईंग यांच्या हातात आहे, चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते…

लाईंग हे सध्या ६४ वर्षांचे आहेत. १९७२-७४ लाईंग यांनी यंगून या विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांचा स्वभाव आधीपासूनच अबोस असल्याने ते खुप कमी बोलायचे आणि लो प्रोफाईल राहायचे, असे त्यांच्या मित्राने रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

१९७४ मध्ये त्तिसऱ्या प्रयत्नात लाईंग यांना डिफेंस अकॅडमीत प्रवेश मिळवळा होता.सुरुवातीला ते एक साधारण विद्यार्थी होते, पण हळूहळू त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रमोशन मिळत गेले. २०११ मध्ये ते लष्कर प्रमुख बनले.

लाईंग कमी बोलत असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय होते, त्यांचे फेसबुकवर हजारो फॉलोवर्स होते. मात्र २०१७ मध्ये रोहिंग्या मुस्लिमांवरील लष्कराच्या कारवाईमुळे त्यांचे पेज बंद करण्यात आले . त्यामुळे २०१६ मध्ये त्यांनी आपला कार्यकाळ वाढवून घेतला होता.

म्यानमार लष्कराच्या कारवाईमुळे २०१७ मध्ये ७ लाख ३० हजारांपेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिम देश सोडून बांग्लादेशला पळून गेले होते. त्यावेळी अनेकांच्या हत्या. अपहरण, गँगरेप झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले होते.

त्यामुळे अमेरिकेने २०१९ मध्ये मिन आंग लाईंग यांच्यावर निर्बंध लावले होते. तसोच लाईंग यांच्याविरोधात अनेक आंतरराष्ट्रीय कोर्टात खटले चालवण्यात आले होते. आजही त्यांच्याविरोधात आयजीसीमध्ये खटला सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.