१६ वर्षाची असताना मुंबईला पळून आलेली गंगुबाई कशी बनली मुंबईची सगळ्यात मोठी डॉन?

0

 

 

संजयलीला भन्साळी यांचा चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ची खुप महिन्यांपासून चर्चा सुरु होती. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ती गंगुबाई काठियावाडीची भुमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्याने गंगुबाई कोण होती असा अनेकांना प्रश्न पडला आहे, चला तर मग जाणून काठियावाडीच्या गंगुबाईबद्दल…

गंगुबाई गुजरातच्या काठियावाडीमध्ये राहणारी महिला होती. त्यामुळेच तिचे नाव गंगुबाई काठियावाडी असे पडले होते. तिचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. तिची आयुष्याची गोष्ट कोणत्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नव्हती.

गंगुबाईला १६ व्या वर्षीच प्रेम झाले होते. तिला आपल्या वडिलांच्या अकाऊंटंटसोबत प्रेम झाले होते. त्यामुळे ती त्याच्याशी लग्न करुन मुंबईला पळून आली होती.

गंगुबाईला लहानपणापासून अभिनेत्री बनायचे होते, ती आशा पारिख आणि हेमा मालिनीची फॅन होती. पण तिच्या नशीबाला ते मान्य नव्हते. तिचा नवरा धोकेबाज माणूस निघाला होता. त्याने गंगुबाईला मुंबईच्या रेडलाईट एरियामध्ये फक्त ५०० रुपयांमध्ये विकून दिले होते.

त्यावेळी ६० च्या दशकात मोठा गुंड असणाऱ्या करिम लालाच्या गँगमधल्या एकाने गंगुबाईचा रेप केला होता. त्यानंतर गंगुबाई करीम लालाला भेटी होती आणि त्याला न्याय मागितला होता. तसेच तिने करिम लाला राखी बांधून भाऊ बनवले होते, पुढे जाऊन ती मुंबईची सगळ्यात मोठी फिमेल डॉन बनली होती.

गंगुबाई मुंबईच्या कमाठीपुराच्या रेड लाईट एरियामध्ये कोठासुद्धा चालवायची. विशेष म्हणजे तिने कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात जाऊन तिला कोठ्यावर ठेवले नव्हते. मुलीची इच्छा असेल तरच ती त्या मुलीला कोठ्यावर ठेवायची. तिने आपल्या शक्तीचा वापर नेहमी महिला सशक्तीकरणासाठी आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी केला होता.

सेक्स वर्कर्स तिला गंगुमा म्हणून ओळखायचे. तिची इतकी धमक होती की कितीही मोठा गुंडा असला तरी तिच्या परवानगीशिवाय त्याला कमाठीपुरामध्ये पाय ठेवता नाही यायचा.

तसेच गंगुबाईने फक्त सेक्स वर्कर्ससाठीच काम नव्हते केले, तिने अनाथ मुलांसाठीही काम केले होते. तिने अनेक मुलांना दत्तक घेतले होते आणि त्यांना शिक्षण दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.