वाचा वानखेडे स्टेडियमचा इतिहास, एका मराठी माणसाने अपमानाचा बदला कसा घेतला होता

0

क्रिकेट म्हटलं की आठवतो तो सचिन आणि सचिन म्हटलं तर आठवते ते वानखेडे स्टेडियम. भारतीय क्रिकेटमध्ये तर अनेक आठवणी आहेत, त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे २०११ चं वर्ल्ड कप भारतानं जिंकणं. ज्या मैदानावर हा वर्ल्ड कप जिंकला होता ते मैदान होते वानखेडे स्टेडियम.

विश्वकपा व्यतिरिक्त वानखेडे स्टेडियमशी क्रिकेट प्रेमींच्या खुप आठवणी जुळलेल्या आहे. त्यामध्ये सचिन तेंडूलकरचा संन्यास असो वा रोहित शर्माचे क्रिकेट विश्वात पदार्पण. पण तुम्हाला वानखेडे स्टेडियमची गोष्ट माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया…

हे मैदान एका क्रिकेट प्रेमीने अपमानाचा बदला घेण्यासाठी बनवले होते. या स्टेडियमची निर्मिती केली होती, नागपुरचे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी. ते एक क्रिकेटप्रेमी होते. राजकारणात असूनही त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. ते महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री होते.

१९६३ मध्ये शेषराव यांना मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. त्यावेळी आमदारांची एक क्रिकेट मॅच झाली पाहिजे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शेषराव स्वता: क्रिकेटप्रेमी असल्याने त्यांनी कुठलाही विचार न करता परवानगी दिली.

सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या पण हा सामना कुठे होणार हा सगळ्यांना प्रश्न पडला होता, कारण एमसीए पुर्ण क्रिकेट मॅनेजमेंट पाहत असले तरी त्याचे स्वता:चे असे कुठलेही मैदान त्यांच्याकडे नव्हते.

तेव्हा ब्रेबॉन मैदान होते त्यावेळी या मैदानाचा उपयोग फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच व्हायचा. पण त्यावर क्रिकेट क्लब ऑफ इंडीयाचा मालकी हक्क होता. त्यामुळे जर त्या मैदानात क्रिकेट खेळायचे असेल तर क्रिकेट क्लबकडून परवानगी घ्यावी लागायची.

त्यावेळी दोघांमधले संबंध एवढे चांगले नव्हते पण शेषरावांनी क्लबच्या प्रमुखांना भेटण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विजय मर्चंट हे क्लबचे प्रमुख होते. शेषराव आपल्या आमदारांसोबत विजय यांच्या भेटीला पोहचले.

शेषरावांनी विजय यांच्यासोबत चर्चा सुरु केली, बोलता बोलता शेषरावांनी क्रिकेटचा विषय काढला आणि ब्रेबॉन मैदानाची सामना खेळण्यासाठी मिळेल का याबाबत विचारणा केली. तेव्हा विजय यांनी मैदान देण्यास साफ नकार दिला.

बोलता बोलता याचे वादात रुपांतर झाले. विजय यांना मराठी माणसावर आधीपासूनच राग होता. या वादात विजय यांनी शेषरावांना घाटी म्हणून हिणवलं, त्यावर शेषराव प्रचंड संतापले आणि त्यांनी मराठी माणसाच्या हक्काचे मैदान बनवण्याचा निर्णय घेतला होता.

शेषरावांनी मुंबईच्या मुख्य भागात हे स्टेडियम उभारले. हे स्टेडियम ब्रेबॉन स्टेडियमपासून थोड्या अंतरावरच उभारण्यात आले. या स्टेडियमची क्षमता ४५ हजार प्रेक्षकांची होती ब्रेबॉन स्टेडियमच्या दुप्पटच. हे पुर्ण स्टेडियम फक्त १३ महिन्यांमध्ये बनवून झाले होते.

या स्टेडियमला शेषरावांच्या नावावरच म्हणजे वानखेडे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे या स्टेडियमचे आर्किटेक्ट एका मराठी माणसानेच केले होते, ते म्हणजे शशी प्रभु. तर असा होता वानखेडे स्टेडियमचा इतिहास

Leave A Reply

Your email address will not be published.