काय सांगता! फक्त १८० रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता वर्षाला करतोय लाखोंची कमाई

0

 

 

असे म्हणतात कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला लाखो रुपयांचे भांडवल पाहिजे. पण या जगात काही लोक असे आहेत, ज्यांनी छोट्या गुंतवणूकीपासून सुरुवात केली होती आणि आता ते लाखोंची कमाई करत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या माणसाने आपल्या व्यवसाची सुरुवात फक्त १८० रुपयांनी केली होती, पण आता तो माणूस वर्षाला लाखोंची कमाई करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव वृद्धि चंद्रमोर्य आहे.

वृद्धि चंद्रमोर्य यांची २००३ मध्ये आर्थिकस्थिती खुप खराब होती, तेव्हा त्यांना घर चालवणेही कठिण झाले होते. त्यांचे शिक्षण फक्त ८ वी पास होते, त्यामुळे त्यांना नोकरी भेटणेही शक्य नव्हते. तसेच त्यांच्याकडे जास्त जमीन सुद्धा नव्हती त्यांच्याकडे फक्त अर्धा एकर जमीन होती.

अशात एका ओळखीच्या डॉक्टरांनी त्यांना नर्सरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायात गुंतवणूकीची गरज नव्हती. त्यामुळे त्यांनी नर्सरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त १८० रुपये होते. त्यांनी त्या १८० रुपयांचे झाडांचे रोपटे विकत घेतले.

वृद्धि चंद्रमोर्य यांच्याकडे सुरुवातीला ५-६ रोपटे होते. ते त्या रोपट्यांना घेऊन सायकलवर गावाभर फिरायचे आणि ते रोपटे विकायचे. ते रात्री नर्सरीचे काम करायचे आणि दिवसा रोपटे विकण्याचे काम करायचे.

त्यांना दोन वर्षात जेवढी कमाई झाली होती, त्यांनी तेवढी पुर्ण कमाई त्यांच्या नर्सरीसाठी लावली आणि त्यांच्य जागेतच एक मोठी नर्सरी तयार केली. त्यांना सुरुवातीला खुप अडचणी आल्या त्यांना रोपट्यांची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी महाराजगंजच्या उद्यान अधिकाऱ्याची भेट घेतली आणि त्यांच्याकडून रोपट्यांची माहिती मिळवली.

आज त्यांच्या नर्सरीमध्ये १००० पेक्षा जास्त रोपटे आहेत. या नर्सरीमधून त्यांना महिन्याला ३० हजार रुपयांची कमाई होत आहे. इतकेच नाही तर त्यांनी ४-५ लोकांना रोजगारही दिले आहे.

आंबा, अननस, लिची, सफरचंद, चिकू, काजू, फळांचे झाडे आहे, तर फुलांमध्ये गुलाब, झेंडू, पिटोनियासारखे रोपटे आहे. तसेच त्यांच्याकडे ब्रम्हकमळ, रुद्राक्षसारखे रोपटे सुद्धा आहे.

वृद्धि चंद्रमोर्य फक्त पहिल्यांदाच रोपटे खरेदी करतात, त्यानंतर ते त्या रोपट्यांपोसून स्वत:च रोपटे तयार करतात. आज त्यांचे रोपटे फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर दिल्ली, राजस्थान, तामिळनाडूसारख्या वेगवेगळ्या राज्यातून त्यांचे रोपटे ट्रान्सपोर्ट होतात. त्यांना दरमहिन्याला विविध राज्यांमधून ५०-६० ऑर्डर येतात, त्यानंतर ते ऑर्डर ग्राहकांच्या पत्त्यावर कुरीयर करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.