विठ्ठल शिंदे यांना ‘उद्या जाईल मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा’, हे कुठं सुचलं? वाचा

0

 

 

महाराष्ट्रात काही असे कलाकार आहेत ज्यांची कारकिर्द ही चांगलीच मोठी आहे. त्यातलेच एक म्हणजे विठ्ठल शिंदे. विठ्ठल शिंदे हे गायक संगतीकार गोष्टींमध्ये माहीर आहे. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले आहे.

विठ्ठल शिंदे यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त गाणी लिहली आहेत. तसेच शिंदेंनी आतापर्यंत दीड हजार गाणी गायली आहे, तर दोन हजार गाण्यांना संगीत दिले आहे, अशाप्रकाचची मोठी कारकिर्द त्यांची आहे.

शिंदे यांच्या गाण्यांमधलेच ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ आणि ‘नवीन पोपट हा’ या गाण्यांचे तुम्ही किस्से ऐकले असतील. तसेच उद्या जाईल ‘मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा’ या गाण्याचा सुद्धा एक भन्नाट किस्सा आहे. चला तर मग आज जाणून घेऊया कसे तयार तयार झाले हे गाणे आणि काय आहे त्यामागचा किस्सा…

देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते, औरंगाबादमध्येही भीमजयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. एकदा औरंगाबादमध्ये भीमजयंतीनिमित्त विठ्ठल शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विठ्ठल शिंदे यांच्या कार्यक्रमाला खुप प्रचंड गर्दी जमली होती, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता, तिथल्या वस्तीतच एक हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम विठ्ठल शिंदेंनी पाहिला आणि तिथेच त्यांना उद्या जाईल मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा… या ओळी सुचल्या आणि तिथेच त्यांना पुढच्या ओळी सुद्धा सुचत गेल्या आणि हे गाणे तयार झाले.

त्यांची संगीत क्षेत्रातील कारकिर्द खुप मोठी आहे, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांना महापौर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते, पण त्यांना एकही राज्य आणि राष्ट्रीय स्तरीय पुरस्काने मिळाला नसल्याने त्याची खंत त्यांना नेहमीच वाटते.

विठ्ठल शिंदे यांनी अनेक गायकांना घडवले आहे. त्यांना मार्गदर्शन केले आहे. विठ्ठल शिंदे यांच्या शिष्यांना राज्य सरकारकडून कला, सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, पण त्यांना एकही पुरस्कार देण्यात आला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.