निर्दोश असताना २० वर्षे भोगला तुरुंगवास, आईवडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मिळाली नव्हती बेल

0

निर्दोष असून २० वर्षे शिक्षा भोगली, पण जेव्हा तो जेलमधून बाहेर आला तेव्हा…

निर्दोष असून २० वर्षे भोगला तुरुंगवास, शिक्षा भोगल्यानंतर घरी आल्यावर कुटुंब झाले होते उध्वस्त

 

असे म्हणतात १०० अपराधी निर्दोश सुटले तरी चालतील पण एका निर्दोशाला शिक्षा झाली नाही पाहिजे. पण विष्णू तिवारी नावाच्या या माणसासोबत जे झाले आहे ते वाचून तुम्हाला धक्का बसेल.

विष्णू तिवारी हे उत्तर प्रदेशच्या ललितपुरमध्ये राहतात. ललित यांच्यावर २००० बलात्काराचा आरोप करण्यात आला होता पण निर्दोश असताना त्यांना हायकोर्टाने जन्मठेपाची शिक्षा दिली होती. २० वर्षांनंतर ते आता निर्दोश साबित झाल्याने तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली आहे.

२० वर्षांनंतर ते सुटले असले तरी त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण नाहीये कारण या २० वर्षात त्याने आपल्या आई-वडिलांना आणि भावंडांना गमावले आहे. त्यामुळे इतके वर्षे तुरुंगात राहून आता सुटका झाल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाहीये.

विष्णू तिवारी १८ वर्षांचे असताना त्यांच्यावर हरिजन ऍक्ट आणि बलात्काराचा आरोप करत महरौनी कोतवालीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सेशन कोर्टाकडून पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या आरोपावरुन विष्णू यांना २००० मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

२००० मध्ये जेव्हा विष्णू यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती, तेव्हा तो एक संपन्न परिवार होता, पण आता २० वर्षांनंतर जेव्हा विष्णू हे आपल्या घरी आले आहे, तेव्हा त्यांनी पाहिले कि त्यांचे पुर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.

असे म्हणतात की विष्णू यांना जेव्हा बलात्काराच्या आरोपाखाली जेव्हा शिक्षा देण्यात आली, तेव्हा त्यांचे वडिल रामेश्वर तिवारी यांचा लोकांनी खुप अपमान केला, त्यामुळे त्यांना पॅरेलिसिसचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. वडिलांच्या मृत्युनंतर विष्णू यांच्या भावाचेही निधन झाले.

पाच भावांमध्ये दिनेशच्या मृत्युनंतर त्यांचा आणखी एक भाऊ रामकिशोर याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यानंतर विष्णू यांच्या आईचेही निधन झाले. अशाप्रकारे समाजाने तिरस्कार केल्याने त्यांचे पुर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. कुटुंबात चार मृत्यु झाल्यानंरही विष्णू यांना अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती.

अशात असे प्रश्न उपस्थित होत आहे की निर्दोश असणाऱ्या विष्णू यांचे भारतीय न्याय व्यवस्था २० वर्षे परत करु शकणार आहे का? एकीकडे सेलिब्रिटींना ताप आला तरी त्यांना तुरुंगातुन बेल मिळते, पण एका गरीब माणसाला त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या अंत्यसंस्कारासाठीही बेल मिळत नसल्याने न्याय व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.