विराटचा राग पाहिलाय पण विराटची रॅगिंग झालेली माहितीये का?; वाचा ‘तो’ किस्सा

0

 

आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपली ओळख जगभरात निर्माण केली आहे. विराट कोहली भारतातल्या सगळ्यात फेमस सेलेब्रिटींपैकी एक आहे. इतकेच काय तर किती कोटी फॉलोअर्स त्याचे सोशल मीडियावर आहे.

त्याने आपल्या खेळामुळे भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी विराट एक आहे. विराटचा चिडखोर स्वभाव नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतो, त्यामुळे विराटची कोणी रॅगिंग केली असेल असा विचार करणेही शक्य नाही.

पण तुम्हाला माहितीये का विराट कोहलीची देखील रॅगिंग झाली ती पण लहान असताना नाही, तर भारतीय संघात असताना. विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरं आहे. आज आपण त्याच किस्स्या बद्दल जाणून घेणार आहोत.

विराटची भारतीय संघात रॅगिंग झाल्याचे त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे. सचिन तेंडुलकर सारखा भविष्यात असणारा खेळाडू म्हणजे विराट. अशी त्याची ओळख असली तरी एकदा आपल्या काही सिनियर खेळाडूंच्या म्हणण्यावरून त्याने सचिनच्या पाया पडल्या होत्या.

जेव्हा विराट कोहली भारतीय संघात नवखा होता, तेव्हा सिनियर खेळाडू त्याची मजाक मस्करी करायचे. एकदा तर एका खेळाडूने सचिन तेंडुलकर जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याचा आशीर्वाद घ्यायचा असे सांगितले.

तेव्हा सचिन तेंडुलकर बाहेर आला असता, विराट कोहली त्याच्या जवळ गेला आणि त्याने सचिन तेंडुलकरच्या पाया पडल्या. यावर सचिनने विराटला विचारले असता, विराटने सगळी हकीकत सांगितली.

तेव्हा विराट सोबत सिनियर खेळाडूंनी मजाक केली असल्याचे सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला सांगितले. विराटने पण ते मजाक म्हणून घेतले, आणि म्हणाला की ज्या माणसाला क्रिकेटचा देवता म्हणतात, त्याच्या पाया पडण्यात कोणती लाज. क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकरच्या पाया पडणे आणि त्याचा आशीर्वाद घेणे ही अभिमानाची बाब आहे, असे विराट कोहली तेव्हा म्हणाला होता.

असाच एक किस्सा आणखी एक आहे. कोहली त्याच्या रागामुळे नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातले अनेक दिग्गज खेळाडू विराटचा राग त्याचे क्रिकेटमधले प्रदर्शन आणखी चांगले बनवते, असे म्हणतात. पण अनेकदा विराटला शांत करण्यासाठी कोचने त्याला झापड मारल्या आहे, हे तुम्हाला माहितीये का?

विराट कोहली मैदानात चांगले प्रदर्शन करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. पण त्याचे रागावर कंट्रोल राहत नाही. विराटच्या कोचने लिहलेल्या एका पुस्तकात त्यांनी असे म्हटले आहे, की जेव्हा विराटला शांत करायचे असायचे तेव्हा विराटला ते थेट कानशिलात लावायचे. विराटला शांत करण्यासाठी त्यांनी अनेकदा विराटच्या कानाखाली वाजवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.