एकीकडे वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे विराटने ठोकले मैदानात शतक; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग

0

 

आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपली ओळख जगभरात निर्माण केली आहे. विराट कोहली भारतातल्या सगळ्यात फेमस सेलेब्रिटींपैकी एक आहे. विराटचे फॅन्स विराट काय खातो, कसा वागतो, कोणते कपडे घालतो, हे बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्याने लोकांमध्येही आपली एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे.

त्याने आपल्या खेळामुळे भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे की तो आपल्या खेळाचे पूर्ण श्रेय त्याचे वडील प्रेम कोहली यांना देतो.

विराट कोहलीला त्याच्या उंचीच्या शिखरापर्यंत पोहचवण्यासाठी प्रेम कोहली यांनी अनेक प्रयत्न केले. सध्या विराट ज्या भारतीय संघात खेळत आहे, त्यात त्याच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे.

विराट कुटुंबामध्ये सगळ्यात जवळ त्याच्या वडिलांच्या होता. त्याचे वडील प्रेम कोहली हे व्यवसायाने एक वकील होते. तेच विराटला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या एका क्रिकेट अकॅडमीमध्ये घेऊन गेले होते. विराटच्या वडिलांचे असे स्वप्न होते की तो भारतीय संघाकडून खेळला पाहिजे, शेवटी ते झाले पण आता ते बघण्यासाठी विराटचे वडील या जगात नाही.

२००६ मध्ये कोहलीच्या वडिलांचे निधन ब्रेन स्ट्रोकमुळे झाले होते. तेव्हा विराट कोहली १८ वर्षांचा होता. आणि तेव्हा तो दिल्ली रणजी संघाकडून कर्नाटक विरोधात खेळत होता.

पहिल्या दिवशी कर्नाटक पहिल्या पारित ४४६ धावा केल्या होत्या. तेव्हा विराट समोर दिल्लीला जिंकवण्याचे लक्ष्य होते. तेव्हा विराट आणि पुनीत हे फलंदाजी करत होते. दोघांनी मिळून दिल्लीचा स्कॉर १०३ पर्यंत पोहचवला होता. विराट ४० धावा करून नाबाद होता. मात्र त्याच दिवशी विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले.

जेव्हा ही बातमी ड्रेसिंग रूममध्ये आली तेव्हा सर्वांना वाटले विराट आता काही खेळणार नाही. कोचने तर कोहलीच्या ऐवजी कोण खेळणार हे देखील ठरवले होते. जेव्हा दुसरा दिवस उगवला तेव्हा विराट सर्वांसोबत मैदानात आला. त्याच्या हातात बॅट होती, त्याला फलंदाजी करायची होती. कोहलीला असे बघून  सगळेच हैराण झाले होते.

त्यादिवशी कोहलीने ९० धावांची अचंबित करणारी खेळी खेळून आऊट झाला होता. त्यानंतर विराट आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी निघून गेला. दिल्लीच्या त्या विजयात विराट कोहलीचे मोठे योगदान होते. विराट कोहलीचा हा किस्सा त्याच्या खेळाबद्दलच्या प्रेमाबद्दल, प्रमाणिकतेबद्दल आणि चांगली खेळी करण्याच्या उत्साहाबद्दल खूप काही सांगून जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.