नोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे ६० लाख रुपये..

0

 

परिस्थीती कशीही असो जर माणसात जिद्द आणि चिकाटी असेल तर नक्कीच ती परिस्थीती तो बदलु शकतो. आजची हि गोष्ट एका अशा तरुणाची आहे, जो एकेकाळी दवाखान्यात पार्ट-टाईम जॉब करत होता. आज तोच तरुण महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

या तरुणाचे नाव विपीन दांगी असे आहे. विपीन आज पशु आहार बनवून महिन्याला ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहे. हातातली नोकरी सोडून त्याने हा व्ययसाय निवडला होता.

विपीन दांगी शेतकरी कुटुंबातील आहे. तो मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये राहतो. त्यांची आर्थिक परिस्थीती सुरुवातीपासून चांगली नव्हती. त्यामुळे लहाणपणणापासूनच त्याने काम करण्यास सुरुवात केली होती.

शिक्षण चालु असताना तो पार्ट-टाईम इंदुरच्या एका रुग्णालयात काम करायचा. जेव्हा विपीनचे शिक्षण पुर्ण झाले, तेव्हा त्याने रुग्णालयाचे काम पुर्ण वेळ करण्यास सुरुवात केली होती.

त्या रुग्णालयात त्यांना चांगला पगार मिळत होता, पण विपीन यांना ते काम करण्यात मन लागत लागत नव्हते. विपीनला काहीतरी व्यवसाय करायचा होता. २०१८ मध्ये त्याने नोकरी सोडली आणि आपल्या गावाला आला.

त्याने सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने काही तरी वेगळा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने इंटरनेटवर माहिती काढली आणि त्याने पशु आहार बनवून त्याची विक्री करण्याचे ठरवले.

पशु आहार बनवण्याचा निर्णय त्याने यामुळे घेतला कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे जनावरे होती, पण शेतकऱ्यांकडे जनावरांना देण्यासाठी पौष्टीक आहार नव्हता.

पशु खाद्य तयार करणारी कोणतीही कंपनी नव्हती, त्यामुळे याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्याने घेतला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने पशुखाद्य तयार करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांच्या या व्यवसायाबद्दल कोणालाही काही माहित नव्हते. त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटींग करण्यासाठी पत्रके छापली, तर लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याने गावात रिक्षा फिरवून स्पिकरच्या मदतीने माहिती दिली.

त्याने केलेली मार्केटींग चांगलीच फायद्याची ठरली. हळुहळु त्यांचे ग्राहक वाढू लागले. आज त्याच्याकडे वेगवेगळ्या गावातील ३ हजारपेक्षा जास्त ग्राहक आहे. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज ६० लाखांपेक्षा जास्त आहे.

कापूस, भुईमुग, मोहरी, सोयाबीन, मका, बार्ली, गहू तसेच डाळींच्या सालींच्या मदतीने हा पशुआहार तयार केला जातो. सगळ्यांचे मिश्रण तयार केले जाते.

त्यात विशिष्ट प्रमाणात फॉस्फरस, आयोडीन, तांबे, कोबाल्ट, कॅल्शियम, यांसारख्या खनिज पदार्थ त्यात मिसळतात. सर्व मिश्रण ग्राइंडरध्ये मिक्स केले जाते आणि त्याची पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.