लहानपणी ब्रेड विकणारा हा तरुण ‘असा’ झाला करोडोंची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक..

0

 

 

अनेकदा माणसाची परिस्थिती त्याला कोणतेही काम करायला भाग पाडते, मात्र संकटाचा सामना करत जो संघर्ष करत असतो त्याची वेळ नक्की बदलते. आजची ही गोष्ट अशाच एका तरुणाची आहे ज्याने लहानपणी ब्रेड विकले पण आज तो कोट्यवधी रुपये कमवत आहे.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव विकास उपाध्याय आहे. विकास लहानपणीपासून आपल्या कुटूंबासोबत गावात राहत होता. वडिलांची एक छोटीशी दुकान होती. तसेच त्याची आई नेहमीच आजारी असल्याने उपचारासाठी घेतलेल्या पैशांमुळे त्यांच्यावर कर्ज होते.

पैशांच्या कर्जामुळे त्याच्या वडिलांनी दिल्लीत येऊन होमगार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली. घर सांभाळण्यासाठी विकासला पण काहीतरी करायचे होते, त्यामुळे ९ वर्षाचा असताना त्याने ब्रेड विकायचे काम केले. तसेच वेगवेगळे कामे करत शाळेचे शिक्षण पूर्ण केले.

तसेच जेव्हा त्याला बिटेकचे शिक्षण घायचे होते, तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्याने सिक्युरिटी गार्डची नोकरी पण केली. शिक्षण सुरू असताना त्याने एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पण काम केले होते. पण त्याला काहीतरी वेगळे करायचे होते. विकासला स्वतःचा व्यवसाय करायचा होता.

विकास नोएडामध्ये काम शोधण्यासाठी आला. त्याला वेबसाईट डेव्हलपमेंटचे काम करायचे होते. तेव्हा तो जिथे राहत होता त्या बिल्डिंगच्या मालकाशी त्याची भेट झाली. त्यांची एक रियल इस्टेटची कंपनी होती. त्यांना एक वेबसाईट बनवणाऱ्या तरुणाची गरज होती. त्यामुळे विकासने त्यांना वेबसाईट बनवून दिली.

विकासाच्या कामामुळे ते खूप खुश झाले आणि त्यांनी विकासला बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्याने अजून काम शोधण्यास सुरुवात केली, या कामात त्याने आपल्या मित्राला पण मदतीसाठी घेतले. अशात त्याला एक मोठा प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अशाप्रकारे त्याला हळूहळू नवीन नवीन प्रोजेक्टवर काम करायला मिळत राहिले आणि त्याने आपली आयटी मार्केटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. त्याला प्रोजेक्ट मिळत गेल्यामुळे त्याने नवीन टीम बनवली.

अखेर २०१५ मध्ये विकासने आपली कंपनी रजिस्टर केली. आज त्यांच्या कंपनीमध्ये ४० कर्मचारी काम करतात. आज या कंपनीची उलाढाल करोडो रुपयांमध्ये आहे. तसेच कॅनडामध्ये याची एक ब्रँच असून विकासला दुबईत पण एक ब्रँच खोलायची आहे.

यश मिळवण्याचा कोणताच शॉर्टकट नसतो, त्यासाठी मेहनतच घ्यावी लागले, जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेत राहिलात तर नक्कीच तुम्हाला तुमचे ध्येय गाठता येते, असे विकास उपाध्यायने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.