पोलिसाचे कर्तव्य बजावून बाकीच्या वेळात आपल्या मुलीसाठी शिकले नृत्य अन् मुलीला जिंकून दिल्या अनेक स्पर्धा

0

 

 

आजकाल मुलं वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत होत असतात. त्यामुळे अनेकदा मुलांना यश मिळते, पण मुलांनी त्या यशासाठी घेतलेल्या मेहनतीत त्यांच्या आई वडिलांचेही मोठे योगदान असते, याचेच एक उदाहरण आता समोर आले आहे ते म्हणजे विकास गडेलवार.

आपल्या मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी विकास यांनी स्वतः पूर्ण नृत्य शिकून घेतले आहे. वडिलांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मुलीनेही देशभरातील अनेक स्पर्धा जिंकून पित्याची मेहनत फळाला आणली आहे.

विकास गडेलवार नागपूर अँटी करप्शन विभागात कार्यरत आहे. विकास यांच्या मुलीचे नाव स्वरा असे आहे. स्वरा हि उत्तम नृत्य सादर करते. कोरिओग्राफर अपूर्वा काकडे यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून स्वरा नृत्याचे धडे घेत होती.

स्वराला लहानपणापासूनच लावणी आणि लोकनृत्याची प्रचंड आवड आहे. फक्त दहा वर्षे वय असणाऱ्या स्वराने आतापर्यंत देहारादून आणि कटकसह अनेक ठिकाणच्या नृत्यु स्पर्धांमध्ये मेडल्स आणि ट्रॉफी जिंकल्या आहे.

स्वराने वयाच्या सातव्या वर्षापासूनच नृत्या शिकायला सुरुवात केली होती. स्वरा आपल्या डान्स टीचरकडून तर नृत्य शिकतेच आहे, तसेच आपल्या वडिलांची ड्युटी संपल्यानंतर त्यांच्याकडूनही सरावासाठी स्वराला मदत होत असते.

विकास यांना संगीताची खूप आवड आहे, तसेच नृत्य आणि गायन सुद्धा विकास करत असतात. आपल्या मुलीप्रमाणे विकास यांनीही अनेक पुरस्कार जिंकलेले आहे.

स्वराला लहानपणापासून नृत्याची आवड होती. त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. नृत्या क्षेत्रात तिला आपले करियर घडवण्याची इच्छा आहे. तिला डान्सिंग स्टार बनायचे असून एक कोरिओग्राफर म्हणून तिला स्वतःची ओळख बनवायची आहे, असे विकास यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.