अरुण गवळींची कॉलर धरून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याबद्दल माहितीये का?

0

 

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्रत्येक आठवण ही थरकाप उडवणारी आहे. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायटेंड हॉटेल बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता.

या हल्ल्यात १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये अनेक पोलिसांनाही वीरमरण आले होते. त्यातलेच एक म्हणजे मुंबईचे विजय साळसकर. आज आपण विजय साळसकर यांच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

विजय साळसकर यांना पोलिसदलात महाराज म्हणून ओळखले जायचे. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईमध्ये जेव्हा आंतकवाद्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये हल्ला केला होता, त्या हल्ल्यातच विजय साळसकर शहीद झाले होते. जेव्हा कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ज्या गाड्यांवर गोळ्या झाडल्या होत्या, तेव्हा त्या गाड्यांमध्ये विजय साळसकर होते.

विजय साळसकर मुंबई स्पेशालिस्ट स्क्वाडमध्ये होते. अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यात विजय यांची महत्वाची भुमिका होती. त्यांच्या नावावर ६१ एन्काऊंटरचा रेकॉर्ड होता. असे म्हणतात की विजय साळसकर यांनी डॉन अरुण गवळी यांच्या पुर्ण साथीदारांचा खात्मा केला होता.

विजय यांना लोक तेव्हा ओळखायला लागले जेव्हा त्यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना तुरुंगात डांबले होते. एक एन्काऊंटर दरम्यान एका १८ वर्षाच्या मुलाला गोळी लागली, त्यामुळे त्याचा मृत्यु झाला होता. त्यानंतरच ते वादात सापडले होते.

एकदा डॉन अरुण गवळी यांनी एका महिला पत्रकाराला मारहाण केली होती, तेव्हा विजय साळसकर हे फक्त ४ पोलिसांना घेऊन अरुण गवळी यांच्या घरी गेले होते. तिथे विजय यांनी अरुण गवळींची कॉलर पकडून त्यांना पोलिस ठाण्यात नेले होते. पोलिस ठाण्यात नेल्यावर वियज यांनी अरुण गवळींना जबर मारहाण केली होती. या गोष्टीमुळे सर्वचजण आश्चर्यचकीच झाले होते, कारण त्याआधी कधीच पोलिस अरुण गवळी यांच्या घरी गेली नव्हती.

१९९७ मध्ये विजय साळसकर यांनी १५ दिवसांच्या आत अरुण गवळी यांच्या तीन शुटरचे एन्काऊंटर केले होते, त्या एन्काऊंटर गणेश भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल यांना मारण्यात आले होते.

विजय साळसकर त्यांच्या कामामुळे चांगलेच प्रसिद्ध होते, कारण ते कोणतेही काम जास्त लोकांना द्यायचे नाही. कारण त्यामुळे एखादे ऑपरेशन मोजक्याच लोकांना राहयची. विजय यांचे सुत्र सर्वत्र पसरलेले होते, त्यामुळे ते त्यांना नेहमीच वेगवेगळे बातम्या वेळेत द्यायचे. तसेच विजय त्यांच्या सुत्रांची आर्थिक मदत देखील करायचे.

Leave A Reply

Your email address will not be published.