कॉलेजसमोर कानाखाली मारलेली सहन झाली नाही अन् तो कॉलेजचा भाई झाला पोलिस अधिकारी

0

 

कॉलेजमध्ये असताना खुप तरुणांना भाईगिरी करण्याची सवय असते, पण भाईगिरी करत असताना काही घटना या अशा घडत असतात, ज्यामुळे एकतर आयुष्य पुर्ण सुधारत नाही, तर पुर्णच बिघडत.

आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने कॉलेजमध्ये तर भाईगिरी केली, पण कॉलेमध्ये झालेल्या एका अपमानामुळे तो इतका पेटून उठला की त्याने PSI अधिकारी होऊनच दम घेतला, या तरुणाचे नाव आहे विजय नाचण.

औरंगाबादच्या एका गावातील सामान्य कुटुंबात विजय नाचण यांचा जन्म झाला होता. ते लहानपणापासूनच खुप खोडकर होते. शाळा असो वा कॉलेज त्यांना तिथे भाई म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्या आईची इच्छा होती की विजय यांनी अधिकारी व्हावं.

विजय हे जेव्हा बारावी नापास झाले, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना औरंगाबाद शहरात शिकण्यासाठी पाठवले, पण तिथेही त्यांची भाईगिरी सुरुच होती. तेव्हा त्यांना राजकारणात खुप रस होता, त्यामुळे विजय लवकरच वाया जाणार होते, असे चित्र समोर दिसत होते.

त्यांना भाईगिरी करायला खुप आवडायचे, त्यामुळे कॉलेजमध्ये खुप भांडण व्हायचे आणि बऱ्याचदा त्यांना पोलिस स्टेशनलाही जावे लागायचे. एकदा कारण नसताना एका PSI ने त्यांच्या कानाखाली मारली, तेव्हा त्याचे त्यांना खुप वाईट वाटले.

विजय यांना कॉलेजमध्ये झालेला हा अपमान सहन झाला आणि त्यांनी PSI बनण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सर्व भाईगिरी सोडली आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी गाव सोडले, त्यावेळी गावातल्या लोकांनी त्यांची खुप मजाक उडवली, पण विजय यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

विजय यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने धाव घेणे सोडले नाही, त्यांच्या या प्रवासात बऱ्याच अडचणी आल्या, त्यांना काही ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला. पण ते अभ्यास करत असताना त्यांचे मित्र पास होत होते, पण विजय यांचा निकाल पाहिजे तसा लागत नव्हता.

विजय यांना त्यांचे ध्येय गाठायचे होते, त्यामुळे त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा नियोजन करुन अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ मध्ये ते प्रिलियमन्स परिक्षा पास झाले, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.

त्यानंतर त्यांची मेन्सची परिक्षा झाली, तिथेही ते पास झाले. फिसिकल आणि मुलाखत त्यांना वाटली तितकी चांगली नव्हती झाली, पण त्यांना स्वत:वर विश्वास होता. अखेर त्यांचा निकाल लागला आणि ते पास झाले. ते PSI होताच पहिल्यांदा ते आपले गावी गेले, तेव्हा त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांची तोंड आपोआपच बंद झाली. आता PSI विजय नाचण हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.