असा मराठमोळा क्रिकेटर होणे नाही, जाणून घ्या विजय हजारेंबद्दल काही रोमांचक गोष्टी

0

भारताचे माजी कर्णधार आणि रेकॉर्डब्रेकिंग कामगिरी करणारे विजय हजारे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणार आहोत.

बऱ्याच जणांना त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. १९४७-४८ ला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर त्यांनी धडाकेबाज खेळी केली होती. भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात आजही त्यांच्यासाठी एक वेगळे स्थान आहे.

कठीण काळात त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताला एक वेगळे स्थान मिळवून दिले होते. त्यांनी भारतासाठी ३० कसोटी सामने खेळले. त्यातील १४ सामन्यात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

इंग्लंडविरूद्ध त्यांनी १९४६ ला क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर त्यांनी डेब्यू केला होता. १९५३ साली त्यांनी आपला अखेरचा क्रिकेटचा सामना खेळला होता. विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ ला झाला होता.

ते महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी होते. त्यांचे वडिल शिक्षक होते. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते पण त्यावेळी त्यांच्यामध्ये दुसरे महायुद्ध आले होते. त्यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये पदार्पन करण्यासाठी थोडा वेळ लागला.

त्यांनी घरगुती क्रिकेट खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. हा काळ भारतीय क्रिकेटसाठी फारसा काही चांगला नव्हता. पण या काळात भारतात क्रिकेटला टिकवून ठेवायचे सगळे श्रेय जाते ते म्हणजे विजय हजारे यांना.

त्यांची खेळी बघण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर २० ते ३० हजार प्रेक्षक जमायचे. १९४३ ते ४४ दरम्यान त्यांनी १४२३ धावा ठोकल्या होत्या. या दरम्यान त्यांनी फक्त चार सामन्यात २४८, ५९, ३०९, १०१, २२३ आणि ८७ अशा एकूण १४२३ धावांची खेळी केली होती.

सगळ्या मिळून त्यांनी १००० धावा केल्या होत्या. ते जवळपास ३३ वर्षांचे होते तोपर्यंत क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी २३८ सामन्यात ६० शतके ठोकली आणि ७३ अर्धशतके ठोकली. त्यांचे असे सगळे मिळून १८ हजार ७४० रन्स होते. तिहेरी शतक झळकवणारे ते पहिलेच फलंदाज होते.

Leave A Reply

Your email address will not be published.