३ एकरात शेती करून हा पठ्ठ्या कमवतोय वर्षाला ५० लाख;  एकदा वाचाच…

0

 

आजच्या काळात अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरी करत आहे. तर अशात काही तरुण शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. आजची ही गोष्ट एका अशाच तरुणाची आहे, जो शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करत वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंत कमवत आहे.

२४ वर्षे वय असलेल्या या तरुण शेतकऱ्याचे नाव विभोर असे आहे. विभोरने तीन एकरच्या जमिनीत ऑरगॅनिक शेती केली आहे. तसेच पशुपालन व्यवसाय देखील करतो, यामुळे तो वर्षाला ५० लाख रुपये कमवतोय.

विभोर यांनी गोपालन सुरू केले, त्यासोबतच त्यांनी २५ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या शेतात लावल्या आहे. त्यामुळे गाईचे शुद्ध तूप आणि दुधासोबतच विभोर भाज्या पण विकतो. तो यासर्व गोष्टी थेट ग्राहकांना विकत असल्याने त्याला याचा चांगला नफा मिळतो.

विभोरच्या म्हणने असे आहे की, ग्राहकांना जर शुद्ध प्रॉडक्ट मिळाले तर त्याची चांगली किंमत द्यायला ग्राहक तयार असतो. विभोरच्या गाईच्या दुधाची किंमत १०० रुपये प्रति लिटर आहे, तर २५०० रुपये किलो तुपाची किंमत आहे. त्यामुळे या उत्पन्नामुळे त्याची चांगली कमाई होते.

विभोर इंजिनिअरिंग करत होता, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला शेती करण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्याने शेतीत काहीतरी वेगळे करून पाहू या इच्छेने गोपालन सुरू केले.

विभोर यांच्याकडे आता जवळपास ६० दूध देणाऱ्या गाय आहेत, तर सर्व मिळून १६५ गायी आहेत. युट्युबवरून मिळालेल्या माहितीवरून आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या शेतीची पाहणी करून विभोरला या शेतीची कल्पना सुचली, त्यामुळे त्याने अशी शेती केली असल्याचे विभोरने म्हटले आहे.

विभोर तीन एकरच्या शेतीत मल्टीलेयर फार्मिंग करून भाज्या उगवत आहे. त्यामुळे याचेही भरघोस उत्पन्न त्याला मिळत आहे. त्याला या शेतीतून आणि पशुपालनातून वर्षाला ५० लाख रुपये मिळत आहे.

विभोर यांनी दाखवून दिले आहे की, शेतकरी कमी जागेत पण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. विभोरची ही गोष्ट अनेक तरुणांनासाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.