२१ वर्षाच्या वयात सुरु केली गांडूळ खताची निर्मिती, आता या व्यवसायातून कमवतेय करोडो रुपये

0

 

 

शेतात शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करताना दिसून येतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीची गोष्ट सांगणार आहोत जी शेतीत उपयोग असणाऱ्या गांडूळ खताची निर्मिती करुन वर्षाला १ कोटींची कमाई करत आहे.

मेरठमध्ये राहणाऱ्या तरुणीचे नाव सना खान आहे. २७ वर्षीय सना खानची एसजे ऑर्गेनिक्स नावाची कंपनी आहे. तिने या कंपनीला २०१४ मध्ये सुरुवात केली होती, जेव्हा ती बी.टेकमध्ये शिकत होती. ७ वर्षांपुर्वी सुरु केलेल्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर १ कोटी आहे. तसेच तिने २५ लोकांना रोजगार सुद्धा दिले आहे.

सनाचा जन्म एका सामान्य कुटुंबातच झाला होता, तिचे वडिल लेडिज टेलर होते, तिचे आजोबा गॅरेज चालवायचे. तिच्या कुटुंबाची इच्छा होती कि तिने डॉक्टर बनावे, पण मेडिकल परिक्षेत तिचे सिलेक्शन होऊ शकले नाही.

त्यानंतर तिने बी.टेकसाठी गाजियाबादच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती कॉलेजला मेरठहून अपडाऊन करायची. बी.टेकच्या शेवटच्या वर्षात कॉलेजमधून वर्मीकम्पोस्टींगचा (गांडूळ खत निर्मिती) एक प्रॉजेक्ट दिला.

हा प्रॉजेक्ट करताना तिने वर्मीकम्पोस्टींगचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. सनाने तिच्या भावासोबत मिळून एसजे ऑर्गेनिक्स कंपनीची सुरुवात केली. प्रशासनाच्या मदतीकडून तिला सरकारी कॉलेजची एक रिकामी जागी मिळाली, तिने तिथेच गांडूळ खताची निर्मिती सुरु केली.

सुरुवातीला ही कंपनी सांभाळण्यासाठी तिला खुप अडचणी आल्या. ती शहरात असल्यामुळे तिला साईटवर जाण्यासाठी १४ किलोमीटर स्कुटीवर गावी जावे लागायचे. तिला बघून गावातले लोक तिला येडी म्हणायचे, कारण ती शहरातून गावात येऊन शेनावर प्रक्रिया करुन गांडूळ खत तयार करायची.

आता सनाने १०४ शाळांमध्ये वर्मीकम्पोस्टींग साईट्स तयार केली. तसेच तिने मेरठमधल्या एका गावात एक एकर जमीन सुद्धा घेतली आहे. तिथे ती ३०० टनपर्यंत वर्मीकम्पोस्टींगची निर्मिती करते. या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर १ कोटींचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.