अकोल्याच्या ‘या’ अडीच वर्षाच्या मुलीची स्मरणशक्ती बघून वेड लागेल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये नोंद

0

 

अनेकदा काही तरुण तरुणी दोन तीन देशांच्या राजधानी सांगताना विचारात पडतात, अशात जर तुम्हाला कोणी २०० देश आणि त्यांच्या राजधानी सांगायला लावल्या तर कोणालाही हे अशक्यच वाटेल. पण चंद्रपूरच्या अडीच वर्षाच्या मुलीने हे करून दाखवलं आहे.

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या या मुलीचे नाव वैदिशा शेरेकर असे आहे. वैदिशा फक्त अडीच वर्षांची असून तिने २०० देशांची नावे आणि त्यांच्या राजधानी लक्षात ठेवल्या आहे. त्यामुळे तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

वैदिशाला पाहून तिचे आताचे वय पळणे खेळण्याचे आहे, पण तिच्या २०० पेक्षा जास्त देशांच्या राजधानी पाठ आहे. इतकेच नाहीत तर कोणत्या देशाचा कोणता राष्ट्रध्वज आहे, हे सुद्धा ती सांगते. त्यामुळे तिच्या स्मरणशक्तीचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

वैदिशाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात तर आलेच आहे, सोबत तिला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात सुद्धा आले आहे. वैदिशाचे वैभव आणि दीपाली शेरेकर यांची मुलगी आहे.

वैभव शेरेकर मूळ अकोलाचे असून सध्या ते चंद्रपुरात बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे. वैभव आणि दीपाली दोघेही लहानपणीपासूनच आपल्या मुलीला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते.

त्यासाठी वैदिशाच्या वडिलांनी फळे, भाजीपाला, प्राणी, पक्षी या सर्वांचे चार्ट घरी आणले आणि ते घरातल्या भिंतींवर चिटकवले. तिला सुरुवातीला ओळख करून दिला त्यानंतर एक ते दोन दिवसात ती प्रत्येक गोष्ट अचुकपणे ओळखू लागली. तेव्हाच तिच्या पालकांना वैदिशाच्या स्मरणशक्तीची कल्पना झाली.

त्यानंतर वैभव यांनी मोबाईलमध्ये तिला वेगवेगळ्या देशांची नावे आणि त्यांच्या राजधानी दाखवल्या आणि त्यांची माहिती दिली. दोन दिवसांनंतर तिला पुन्हा देश आणि राजधानी दाखवण्यात आले, तेव्हा न चुकता तिने सर्व ओळखल्या.

त्यानंतर वैभव यांनी देश त्याची राजधानी आणि त्या देशाचा राष्ट्रध्वज असा चार्ट आणला. नोव्हेंबर पासून तिच्या आईने तिला या सर्वांची माहिती देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी तिला पुन्हा हे सर्व विचारणात तर तिने पटापट सांगितले, त्यामुळे तिची ही स्मरणशक्ती बघून तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.