अभिमानास्पद! पुण्याच्या वैदहीचा अमेरिकेत डंका, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रेखाटली कलाकृती

0

 

अमेरिकेतली राष्ट्रध्यक्षपदाची निवड सगळीकडेच अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय असतो. आता अमेरिकेच्या निवडणूत तर पुण्याच्या एक युवा कलाकाराने महत्वाची भूमिका पार पाडलेली, त्यामुळे सगळीकडेच त्या कलाकाराची चर्चा रंगली आहे.

अमेरिकेतील स्त्रियांमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी थिंक वुमन या संस्थेकडून एक मोहिम राबवल होती. त्या मोहिमेत पुण्यातील वैदही रेड्डी हिने तयार केलेल्या बोधचिन्हाचा  वापर करण्यात आला होता.

अशाप्रकारे अमेरिकेच्या निवडणुकीत जनजागृती करण्यासाठी वैदहिनेही सहभाग घेतल्याने सगळीकडे तिचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे फक्त पुणे किंवा महाराष्ट्रासाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

थिंक वूमनचा मोहिमेत वैदहीच्या चित्रकृतीचा ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करण्यात आला होता. वैदहीने आपले शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये केले आहे. तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहे.

वैदहीने तिच्या चित्रामध्ये सध्याच्या स्त्रीचे वर्णन केले आहे.ही कलाकृतीची निर्मिती वैदहीने २०१८ मध्ये केली होती. या कलाकृतीत आजच्या स्त्रीचे प्रेरणा, विचार आणि स्वप्न दर्शवले असल्याने थिंक वूमनने तिच्या कलाकृतीची निवड जनजागृतीच्या बोधचिन्हासाठी केली होती.

वैदहीने यापूर्वी अनेक सन्मान मिळवले आहे. तसेच २०१४ साली राष्ट्रीय स्तरावरील गुगल डूडल स्पर्धाही तिने जिंकली होती. वैदहीने अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठाची २ कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही मिळवली होती.

निवडणूकीच्या प्रक्रियेत महिला जागरूकता आणि महिला मतदारांना येणाऱ्या गंभीर प्रश्नांना विधायक कार्यासाठी माझ्या कलाकृतीचा वापर आला, हे माझ्यासाठी सन्मानिय आहे, असे वैदही रेड्डी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.