डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देणाऱ्या महाराज सयाजीरावांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीये का?

0

 

 

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्याचे भाषा वैभव, त्या लेखनामागचा त्यांचा विचार आजही वाचकाला थक्क करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते.

डॉ. आंबेडकर हे पहिले असे भारतीय होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रातील पहिले डॉक्टरेटची पदवी मिळवली. पण जेव्हा आंबेडकर युवा होते तेव्हा त्यांना परदेशात जायचे होते, पण त्यांची परिस्थिती गरीबीची होती. तेव्हा त्यांना बडोदा संस्थानचे संस्थापक छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज यांनी शिष्यवृत्ती दिली होती आणि त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले होते.

सयाजीराव गायकवाड हे गरीबी अनुभवलेले राजे होते, त्यांचा गुराखी ते राजा बनण्याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, चला तर मग आज जाणून घेऊया कोण होते छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज…

सयाजीराव गायकवाड यांचा जन्म १८६३ मध्ये झाला होता. ते एक सामान्य शेतकरी कुटुंबातले होते. त्यांचे लहानपणी गोपाळ काशिराव गायकवाड असे नाव होते. त्यांच्या कुटुंबाचा संबंध बडोद्याच्या राजघराण्याशी होता.

त्यामुळेच बडोद्याच्या महाराणी जमनाबाई यांनी त्यांच्या पती महाराज खंडेराव गायकवाड यांच्या निधनानंतर राजगाधीसाठी गोपाळ यांना दत्तक घेतले होते. २७ मे १८७५ मध्ये त्यांचा राज्यभिषेक झाला होता आणि तेव्हाच त्यांना सयाजीराव गायकवाड असे नाव मिळाले होते.

सयाजीराव गायकवाड हे एकमेव राजे होते, ज्यांनी तब्बल ६० वर्षे यशस्वीपणे राज्य केले. त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीत शिक्षण, नागरी सुविधा, वाचन संस्कृती, क्रिडा, बँकिंग अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी महत्वाचे योगदान दिले होते. तसेच त्यांनी जनतेच्या हितासाठी खुप महत्वाची कामे केली होती.

१८९० मध्ये सयाजीराव गायकवाड बडोद्यापासून १२ मैलांवर सुर्या नदी आणि वागली नाला हे दोन जलप्रवाहावर त्यांनी भारताचे पहिले नावीण्यपुर्ण धरण बांधले होते. त्यांना दारिद्र्य, बेरोजगारी या सर्व गोष्टी शिक्षणाच्या अभावामुळे होत आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी गावागावांमध्ये शाळा सुरु केल्या, तसेच त्यांनी सगळ्यांसाठी सक्तीचे शिक्षण केले.

त्यांनी स्त्री शिक्षणालाही महत्व दिले होते. त्यांनी बडोद्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली होती. त्यांच्या या स्त्री शिक्षणाच्या मोहिमेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळत होता, की जितक्या मुली विद्येचे माहेरघर पुण्यात शिक्षणासाठी येत नव्हत्या त्यापेक्षा जास्त मुली बडोद्याच्या शाळेत शिक्षण घेत होत्या.

सयाजीराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठीही खुप महत्वाची कामे केली होती. त्यातलेच एक काम म्हणजे बँक ऑफ बडोदाची सुरुवात. दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांना बियानांच्या, शेतीच्या खर्चासाठी त्यांनी या बँकेची सुरुवात केली होती, त्यावेळी शेतकऱ्यांना या बँकेचा मोठा आधार मिळाला होता.

सयाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी दरमहा पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती. तसेच आंबेडकरांना पी.एचडीच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. तसेच सयाजीराव यांनी अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च आणि तिथे राहण्याचा खर्च केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.