सरकारी नोकरी सोडून शेळीपालनातून दोन मित्र कमावत आहेत महिन्याला ८ लाख आणि वर्षाला १२ कोटी

0

गावातील मुले शहरात येतात आणि नोकरी, व्यवसाय करतात पण ती मुले साधारण किती कमावतात? १० हजार, १५ हजार किंवा फार फार तर १ लाख रुपये. पण आज आम्ही तुम्हाला अशा दोन युवकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी १२ कोटी रुपये कमावले आहेत.

अहमदनगरमधील पाथर्डीसारख्या दुष्काळी भागातून दोन मित्र शहरात आले. १० वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि शेळीपालन व्यवसाय सुरू केला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हे दोघे आज वर्षाला १२ कोटी ५४ लाख रुपये कमावतात.

त्यांना शेळ्यांच्या विक्रीतून १३ कोटी आणि लेंडीखतातून १८ लाख रुपये मिळतात. तसेच शेळीपालन कसे करावे हे शिकवण्यासाठी ते मानधन घेतात त्यातून त्यांना ३६ लाख रुपये मिळतात. तुम्हाला हे अशक्य वाटत असेल पण हे खरे आहे.

त्या दोन मित्रांची नावे आहेत राहुल खामकर आणि सतीश एडके. त्यातील राहुल खामकर हा कृषी सहाय्यक होता पण त्याने सरकारी नोकरी सोडली आणि आपल्या मित्राच्या साथीने शेळीपालन करू लागला.

त्यांनी २० शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि आता त्यांच्याकडे १३ जातींच्या शेळ्या आहेत. तेरा जातींसाठी त्यांनी वेगवेगळे शेड उभारून त्यांचे भाग केले. करडे, शेळ्या आणि बोकडांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली.

आज फक्त आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्यांचे उत्पादन करत आहेत आणि यातून ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत. आज त्यांच्याकडे ७४० शेळ्या आहेत. जवळपास एक ते दीड हजार किलोच्या दरानं दरवर्षी तब्बल ४ हजार करडं विक्री हे दोघे करतात.

ते शेळीचे दूध आणि लेंडीखतही विकतात. शेळीपालन कसे करावे? हे शिकवतानाही ते पैसे कमावतात. दोघेही महिन्याला ८ लाख रुपये कमावतात. कितीही मोठ्या कंपनीत काम केले तरी तुम्हाला कोणीही इतका पगार महिन्याला देणार नाही. गावाकडच्या या दोन मित्रांनी संधीचे सोने करून नवीन आदर्श उभा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.