दोन भावांचा नादच नाय! आधी महिन्याला ८ हजार पगार होता, आता दोघेही झालेत अब्जाधिश

0

अशी अनेक मुले असतात जी शाळेत धिंगाणा घालतात, गोंधळ करतात पण ती मुले हुशारही असतात. आजची गोष्ट अशाच एका मुलाची आहे ज्याचे शाळेत मन लागत नव्हते मग त्याने मित्राच्या मदतीने मोबाईल रीपेरींग करायचा नाद लागला.

त्याच्या आई वडीलांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याच्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या. त्यांना हे मान्य नव्हतं की आपल्या मुलाने अभ्यास सोडून दुसरे उद्योग करावे. साहजिकच आहे त्यांच्या जागी कोणीही असते तरी त्यांनीही हेच केले असते.

पण आई वडीलांची कितीही इच्छा असली तरी मुलाला मात्र अभ्यासात काहीच रस नव्हता. मग त्याने कॉल सेंटरमध्ये नोकरी करायला सुरूवात केली. तिथे त्याला महिन्याला ८ हजार रूपये पगार होता.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पुढे जाऊन हाच मुलगा आणि त्याचा भाऊ अब्जाधिश बनले. आज आम्ही त्या दोघांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. निखिल आणि नितीन कामत असे त्या दोघांचे नाव आहे.

हे दोन्ही भाऊ झिरोधा कंपनीचे मालक आहेत. कामत बंधूंचा हा प्रवास कुठल्याही सामान्य व्यक्तीसारखाच आहे. त्यांचे वडील एका बॅंकेत कामाला होते. हे दोघे रोज शाळेत जायचे पण त्यांच्यावर कायम अभ्यास करण्याचे दडपण असायचे.

निखिल तिसरीमध्ये असताना त्याच्या सरांनी त्याला मारले तेव्हापासून त्याचे अभ्यासावरून मन उडाले. पुढे तो शाळेत जात नसल्याने त्याला १० वीच्या बोर्डाची परीक्षाही देता आली नाही.

शेवटी काहीतरी करायचे म्हणून तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करू लागला. दुसरीकडे त्याचा भाऊ नितीन इंजिनिअरींग करत होता. निखिलला चेस खेळायला खुप आवडायचे. अशा अनेक गोष्टींमध्ये तो हुशार होता.

चेस प्रमाणे तो अजून एका गोष्टीत खुप हुशार होता ते म्हणजे शेअर्स फिरवण्यामध्ये. दोन्ही भावांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांना शेअर मार्केटिंगचं प्रचंड वेड होतं. आजच्याही बऱ्याच तरूणांना शेअर मार्केटिंगचे वेड आहे पण यामध्ये रीस्क खुप असते.

निखिल रात्रभर कॉल सेंटवर काम करत असे आणि दिवसभर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असे. सुरूवातीला त्याच्या वडीलांना त्याला थोडे पैसै दिले होते. नंतर त्याने तो ज्या ठिकाणी कॉल सेंटरवर काम करत होता तेथील मालकाला शेअर मार्केटिंगमध्ये पैसै गुंतवण्यास तयार केले.

पुढे तो वर्षभर कामाला गेला नाही तरी त्याला महिन्याचा पुर्ण पगार मिळत होता. कारण त्याने आपल्या मालकाला शेअर मार्केटिंगमधून चांगला पैसा कमावून दिला होता. पुढे दोन्ही भावांनी मिळून कामत असोसिएट्सची स्थापना केली.

२०१० पर्यंत त्यांना कळले होते की आपण शेअर मार्केटिंगमध्ये काहीतरी करू शकतो. त्यांनी झिरोधा नावाची कंपनी सुरू केली. दोन्ही भाऊ म्हणाले की ही कंपनी सुरू करण्याच्या आधी अनेकांना शेअर मार्केटींगमध्ये पैसै गुंतवण्यास खुप अडचणी येत होत्या.

आम्ही सुरूवातीपासूनच त्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. झिरोधाचा अर्थही खुप रोजक आहे. झि म्हणजे झिरो आणि रोधा म्हणजे अडचण. हा एक संस्कृत शब्द आहे. आता त्यांच्या कंपनीत ९०० लोक काम करतात.

तर देशातल्या पहिल्या १०० श्रीमंतामध्ये त्यांची गणना केली जाते. दिवसातला पुर्ण वेळ दे आपल्या कंपनीला देतात. तुम्हाला या भावंडाची यशोगाथा कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.