७७ वर्षांच्या या आजोबांसमोर मोठमोठे बिल्डरही होतात फेल, स्वत: विराट कोहलीही आहे त्यांचा फॅन

0

चंदीगढ येथील रहिवासी असलेले ७७ वर्षीय तृप्त सिंह आपल्या फिटनेसमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. एवढचं काय तर अनेक तरूणांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत. तृप्त सिंह अनेकांना आहार काय घ्यायचा याचे सल्ले देतात. आज आम्ही तुम्हाला त्यांची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत.

क्रिकेटर विराट कोहली असो किंवा त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा असो ७७ वर्षीय तृप्त सिंह यांच्या फिटनेसवर अनेक लोक फिदा आहेत. चंदीगढ येथील मोहाली येथील रहिवासी असलेले तृप्त सिंह त्यांच्यायेथील अनेक तरूणांना चितपट करण्याची ताकद ठेवतात.

निवृत्त झाल्यानंतर ते कसे काय इतके फिट राहिले? त्यांच्या या फिटनेसचा कानमंत्र काय आहे ? असे म्हणतात की age is just a number हा इंग्रजीमधील म्हण तृप्त सिंग यांच्यावर तंतोतंत लागू होते. पंजाबमधील जलंदर येथे त्यांचे लहाणपण आणि तरूणपण गेले.

लहाणपणापासूनच त्यांना व्यायामाची सवय होती. पंजाबी खाणे-पिणे, जोर बैठका मारणे, अनेक किलोमीटर पळणे ही त्यांची रोजची दिनचर्या होती. पण परिस्थिती त्यांना त्यापासून दूर घेऊन आली आणि लग्न झाल्यानंतर ते दिल्लीमध्ये आले. त्यांचा व्यायाम सुटला.

१९९९ मध्ये जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा ते आपल्या मुलांसोबत मोहाली येथे राहण्यास आले. एक दिवस झाले असे की एका नातेवाईकाने तृप्त सिंह यांच्या वाढत्या पोटामुळे त्यांची थट्टा केली. त्या दिवशी त्यांनी ठरवले की आजपासून आपण आपल्या शरीराला फिट ठेवायचा प्रयत्न करायचा.

६३ वर्षांचे असताना त्यांनी पुन्हा पळायला सुरूवात केली. शहरात अनेक ठिकाणी मॅरेथॉन होत असत. ते प्रत्येक मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ लागले. आश्चर्यकारक भाग म्हणजे त्यांनी ६० वर्षांच्या वरील मॅरेथॉनच्या ऐवजी तरूणांच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला.

त्यामध्ये त्यांना अनेक मॅरेथॉनमध्ये २ गोल्ड मेडल, १ सिल्वर मेडल आणि ४ ब्रॉन्ज मेडल मिळाले आहेत. त्यांच्या डाएटमध्ये प्री वर्कआउटच्या वेळी ते २ केळी, रताळे यांचा समावेश होता. पोस्ट वर्कआउटमध्ये सलाद, ओट्स, नट्स आणि अश्वगंधा यांचा समावेश आहे.

जेवणामध्ये ते सलाद, चपाती, बीन्सची भाजी खातात. संध्याकाळच्या वेळी ते भाजलेले चणे किंवा मसालेदार चणे खातात. दिवसभरातून ते चार ते पाच लिटर पाणी पितात. त्यांना वजन कमी करायचे होते आणि फिट व्हायचे होते. पण झाले असे होते की त्यांची पोटावरची चरबी तशीच राहिली आणि लुकड्या शरीरावर ती आणखीनच उठून दिसत होती.

त्यानंतर त्यांनी ६९ च्या वयात सिनीअर सिटीजनच्या जिममध्ये जाण्याचे ठरवले. त्यांना त्यांच्या घरच्यांनी खुप विरोध केला की या वयात तुम्हाला हे झेपणार नाही. पण त्यांचे फक्त धेयाकडे लक्ष होते. जिममध्ये आपल्या आजोबांच्या वयाच्या माणसाला बघून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्यांची थट्टा करण्यास सुरूवात केली.

एकदा जिममध्ये पुशअप्स मारण्याची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत तृप्त सिंग यांनी ५८४ पुशअप्स मारून सगळ्यांची तोंडे बंद केली होती. मग झाले असे की जिमच्या संचालकाने त्यांची जिमची लाईफटाईम फी माफ करून टाकली. आता ७ वर्षे झाली तृप्त सिंह त्या जिममध्ये येतात आणि खुप अवघड व्यायाम करून अनेकांना थक्क करून टाकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.