नाजूक आहे पण कमजोर नाही! जाणून घ्या, या महिला ट्रक मेकॅनिकबद्दल जी काढते ट्रकांच्या टायरांचे पंक्चर

0

एखाद्या ट्रकची रिपेरिंग काम असेल किंवा वेल्डिंग काम असेल अशावेळी आपल्याला लगेच एखादा माणूस आठवतो. अशावेळी आपल्या डोळ्यांसमोर कधीच स्त्री येत नाही.

अवजड काम करताना आपण कधीच एखाद्या स्त्रीला पाहिले नसेल, पण एकदा एखाद्या स्त्रीने एखादे काम करायचे ठरले तर ती कोणतेही काम करु शकते मग ते कितीही अवजड असो, याचे उत्तम उदाहरण आहे तेलंगणाची आदिलक्ष्मी.

तेलंगणाच्या कोथागुडेम जिल्ह्याच्या सुजातानगरमध्ये आदिलक्ष्मी राहते. ती आपल्या पतीबरोबर टायर रिपेरींगचे काम करते. आदिलक्षमी तेलंगणाची एकमेव ट्रक मॅकेनिक आहे. आदिलक्ष्मीचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांना आता दोन मुली आहे.

३० वर्षे वय असणारी आदिलक्ष्मी तेलंगणा राज्यातील अशी महिला आहे, जी हे सर्व कामे आरामशीर करताना दिसून येते. ज्याप्रमाणे ती शॉपमध्ये काम करताना रिपेरींग टुल वापरते, त्याचप्रमाणे ती घर सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने सांभाळते.

तीन वर्षांपुर्वी आदिलक्ष्मी आणि तिच्या पतीने मिळून रिपेअरिंग शॉप उघडली होती. परिस्थीती गरीब असल्याने त्यांना आपले घर गहान ठेवावे लागले होते. सुरुवातीला आदिलक्ष्मीला बघून शॉपमध्ये येत नव्हते कारण त्यांना असे वाटायचे की तिला पंक्चर व्यवस्थित नाही काढता येणार.

आता मात्र लोकांना आदिलक्ष्मीवर विश्वास बसला आहे. त्यांचे शॉप दिवसभर उघडे असते. तसेच त्यांच्या शॉपचे काम व्यवस्थित असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आमच्यावर असणारे कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले होते, त्यामुळे मी माझ्या पतीच्याच व्यवसायात त्यांची मदत करण्याचे ठरवले. मला दोन मुली आहे, मला जर सरकारकडून मदत भेटली मला त्यांचे भविष्य सुधारता येईल, असे आदिलक्ष्मीने म्हटले आहे.

आदिलक्ष्मी पंक्चर काढण्यासोबतच वेल्डींग काम सुद्धा चांगले करते. तसेच ती मेटल फ्रेम फॅब्रिकेटरचे काम पण उत्तम करते.  आदिलक्ष्मीला इतके अवजड काम करताना बघून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.