जेव्हा सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी ट्रान्सजेंडर वकील बनते तेव्हा…

0

ट्रान्सजेंडर निशा राव आज जगभरात प्रसिद्ध आहेत. रस्त्यावर, सिग्नलवर, ट्रेनमध्ये बसून भीक मागणारी निशा वकील कशी बनली? ही कहाणी खुपच प्रेरणादायी आहे. ती पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील आहे. पण पाकिस्तानच्या आधी भारतात असे अनेक ट्रान्सजेंडर आहेत ज्यांनी संघर्ष करून गगणाला भरारी मारली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील निशा राव जगभरातील ट्रान्सजेंडर्ससाठी एक प्रेरणा ठरली आहे. कराची बार असोसिएशनकडून परवाना मिळवणारी ती पहिली ट्रांन्सजेंडर आहे. निशा राव यांच्या संघर्षाची कहाणी जगभरातील लोकांना प्रेरणा देणारी आहे.

लाहोरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशा राव हिने १८ वर्षांची असताना घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या कराची येथे पोहोचल्या. बराच काळ इतर ट्रान्सजेंडर्सप्रमाणेच त्यांनीही रस्त्याच्या कडेला भीक मागून दिवस काढले.

पण त्यांच्या मनात काहीतरी करण्याची इच्छा जागी झाली आणि त्यांनी वकीलीच्या अभ्याक्रमाला प्रवेश घेतला. तिथून त्यांच्या जीवनाला वळण आले. अनेक कठीण परिश्रमानंतर त्यांना कराची बार असोसिएशनकडून वकीलीचा परवाना मिळाला.

निशा राव यांनी आतापर्यंत ५० खटले लढले आहेत. ट्रान्सजेंडर्ससाठी काम करणार्‍या संस्थेबरोबरही त्या काम करतात. निशा यांना समाजातील इतर घटकांशी ट्रान्सजेंडरला जोडायचे आहे आणि त्यांना समान अधिकार मिळवून द्यायचा आहे.

त्यांचे म्हणणे आहे की त्यांना पाकिस्तानमधील पहिली ट्रान्सजेंडर बनायचे आहे जी एक वकील आहे. त्यांना जीवनात खुप पुढे जायचे आहे. तुम्हाला माहित नसेल पण भारतात एक अशी ट्रान्सजेंडर आहे जी वकीलसुद्धा आहे आणि न्यायाधिशसुद्धा.

भारतातील पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश होण्याची नोंद पश्चिम बंगालच्या जोयिता मंडलच्या नावावर आहे. २०१७ मध्ये ती वयाच्या २९ व्या वर्षी लोकअदालत न्यायाधीश ठरली. या व्यतिरिक्त, तामिळनाडूची सत्यश्री शर्मिला २०१८ मध्ये भारताची प्रथम ट्रान्सजेंडर वकील ठरली. केरळच्या कोची येथे ट्रान्सजेंडरसाठी एक शाळा असून यूपीच्या कुशीनगरमध्ये ट्रान्सजेंडरसाठी विद्यापीठ बनविण्यात आले आहे.

आज अनेक क्षेत्रात ट्रान्सजेंडर पुढे जात आहेत. पण अजूनही भीक मागणाऱ्या आणि खुप हालाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या ट्रान्सजेंडर्सची संख्या जास्त आहे. त्यांना त्या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी अनेक संस्था मदत करत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.