आईला सलाम! एकीकडे ड्युटी, तर दुसरीकडे आईची माया, पहा कसे सांभाळतेय दोन्ही गोष्टी

0

 

सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशात सध्या एका महिला ट्राफिक पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ती एकीकडे आपले ड्युटीचे कर्तव्य पार पाडत आहे, तर दुसरीकडे ती आईचेही कर्तव्य पार पाडताना ती दिसून येत आहे. ती आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेत आपले काम करताना दिसून येत आहे, त्यामुळे सगळीकडेच या महिलेचे कौतूक केले जात आहे.

चंदीगडमध्ये शुक्रवारी महिला ट्राफिक पोलिस आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ड्युटी बजावताना दिसली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रियंका असे आहे.

माझा मुलगा लहान आहे, माझ्याशिवाय माझा मुलगा घरी एकटा राहू शकत नाही. बऱ्याचवेळा माझे पती किंवा कुटुंबातील सदस्य मी ड्युटी करत असल्याचे ठिकाणी मुलाला घेऊन येतात. जर माझा मुलगा रडत असेल, तर मी त्याला कडेवर घेते आणि पुन्हा आपली ड्युटी सुरु करते, असे प्रियंकाने म्हटले आहे.

तसेच एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याची ड्युटी तिथे लावण्यात आली होती. पण तिथे दोघेही दिसले नाही, तेव्हा प्रियंकाला तिथे तातडीने बोलावून घेण्यात आले, त्यामुळे तिला आपल्या मुलाला तिथे ड्युटीवर घेऊन यावे लागले होते.

प्रियंका हातात लहान बाळाला घेऊन तशीच ड्युटी करत उभी राहिली. ऊन, वारा, गाड्यांचा वाहनांचा आवाज सहन करत सर्व अडचणींना तोंड देत ड्युटी सांभाळत होती, त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विटर युजर गगनदीप यांनी शेअर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.