हे पाच स्पिनर्स भारताला बनवू शकता टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन, वाचा कोण आहेत ते धडाकेबाज खेळाडू

0

 

सध्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी जगभरातील वेगवेगळे संघ तयारीला लागलेले आहे. अशात भारतीय संघाने सुद्धा टी-२० बाबतची तयार सुरु केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत वेगवेगळ्या खेळाडूंचे प्रदर्शन बघितले आहे, त्यामुळे टी-२० स्पर्धेसाठी खेळाडू निवडणे सोपे होणार आहे.

भारतीय संघात अनेक बॉलर असे आहेत, ज्यांच्या मदतीने भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकणे सहज शक्य होणार आहे. चला तर मग नरज टाकूया त्या ५ भारतीय स्पिनर्सवर जे भारताला हे वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मदत करु शकतात.

१. राहूल चाहर-

राहूल चाहरला नुकतेच भारतीय टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने आयपीएलच्या ३१ सामन्यात ७.४७ इकोनॉमी रेटने ३० विकेट घेतल्या आहे. मुंबई इंडियन्सच्या विश्वासू स्पिनर्समध्ये राहूल चाहरला गिणले जाते. राहूलच्या फिरकीने अनेकदा विराट कोहलीला सुद्धा पेचात पाडले आहे.

२. वरुण चक्रवर्ती-

वरुणने आपली ओळख आयपीलमधूनच तयार केली आहे. त्याने आयपीएलच्या १४ सामन्यांमध्ये १८ विकेट मिळवल्या होत्या. त्याला मिस्ट्री स्पिनर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याच्या फिरकीमुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. पण दुखापतीमुळे त्याला सामना एकही सामना खेळता आला नाही, त्याची आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड केली जाऊ शकते.

३. रविचंद्रन अश्विन-

भारतीय संघातील विश्वासू फिरकीपटू म्हणून अश्विनची ओळख आहे, त्याच्या कॅरम बॉलने तो अनेकदा मोठमोठ्या फलंदाजांना चकमा देताना दिसतो. त्याने नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे अश्विनची निवड टी-२० वर्ल्डकपसाठी केली जाऊ शकते.

४. अक्षर पटेल-

अक्षरने नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात पदार्पण केले आहे. पहिल्याच तीन सामन्यात त्याने २७ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे टी-२० च्या भारतीय संघात त्याची निवड केली जाऊ शकते, त्याने आयपीएलमध्ये ९७ सामने खेळले असून ८० विकेट घेतल्या आहे.

5. राहूल तेवतिया-

राहूलने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन विरुद्ध एका ओव्हरमध्ये ५ सिक्स लावले, त्यामुळे त्याने जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तो फलंदाजासोबतच एक चांगला स्पिनर सुद्धा आहे. तो टी-२० सामन्यात एक ऑलराऊंडर म्हणून सुद्धा खेळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.