भारतातील सगळ्यात मोठे पाच युट्यूबर्स कोण आहेत माहिती का? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..

0

तुम्ही जर युट्यूबवर जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला बरेच युट्यूबर माहित असतील. आज आम्ही तुम्हाला त्यातीलच काही टॉपच्या युट्यूबर्सबद्दल माहिती सांगणार आहोत. जसे की आशिष चंचलानी, अमित भडाणा, गौरव चौधरी आणि अजय नागर.

Carryminati: अजय नागर जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा carryminati नावाचा युट्यूब चॅनेल आहे. कॅरी सगळ्यात जास्त चर्चेत तेव्हा आला होता जेव्हा त्याने टीकटॉकच्या विरोधात एक व्हिडीओ बनवली होती. त्या व्हिडीओला लोकांनी खुप प्रतिसाद दर्शवला होता.

अमिर सिद्दीकी नावाच्या एका टीकटॉक स्टारने या वादाला सुरूवात केली होती. पण युट्यूबने या व्हिडीओला हटवले होते. त्यानंतर युट्यूबवर कॅरीचे चाहते खुप भडकले होते. त्यानंतर कॅरीने यल्गार हे गाणे युट्यूबला अपलोड केले होते.

त्या गाण्यानेही नवीन रेकॉर्ड बनवला. अजय नागर म्हणजे कॅरीने १२ वी नंतर आपले शिक्षण सोडून दिले. पण ओपन स्कुलमधून तो सध्या शिक्षण घेत आहे. त्याचे युटयूबला २१.४ मिलीयन सब्सक्राईबर आहेत.

आशिष चंचलानी: आशिष चंचलाणी सगळ्यात कॉमेडी युट्यूबर आहे. त्याच्या चॅनलचे नाव आशिष चंचलानी वाईन्स असे आहे. त्याचे युट्यूबवर २४ मिलीयन सब्सक्राईबर आहेत. आशिष ट्रेडिंग टॉपिकवर व्हिडीओ बनविण्यासाठी फेमस आहे.

नुकताच त्याने लॉकडाऊनवर व्हिडीओ बनवला होता जो खुप व्हायरल झाला होता. त्याच्या अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. आशिष चंचलानीसोबत काम करणाऱ्या त्याच्या साथिदारांचेही युट्यूब चॅनेल आहे. आशिष त्यांच्याही व्हिडीओमध्ये अधून मधून झळकत असतो.

भुवन बम: भुवन बमला आज कोण नाही ओळखत. भुवन बमच्या चॅनलचे नाव बीबी की वाईन्स आहे. त्याचे व्हिडीओज भारतातच नाही तर विदेशातही फेमस आहेत. भुवन एकटाच अनेक भुमिका साकारतो. त्याच्या अनेक भुमिका फेमस आहेत.

जसे की टीटू मामा, डिक्टेक्टिव्ह मंगलू, समीर, बॅन्चो. तो याव्यतिरीक्त गाणेही गातो आणि गाणेही लिहीतो. भुवन बमची गाणीही लोक खुप पसंत करतात. भुवन बमचे भारतात सगळ्यात जास्त चाहते आहेत. लोक त्याला खुप पसंत करतात. भुवन बम मराठी माणूस आहे.

अमित भडाना: युट्यूबवर अमित भडानाचे २०.५ मिलीयन फॉलोवर्स आहेत. अमित भडाणाही भुवन बमसारखा खुप फेमस युट्यूबर आहे. त्याचे व्हिडीओही खुप कॉमेडी असतात. पण त्याचे व्हिडीओ एका एपिसोडसारखे असतात. त्याने २०१२ ला युट्यूब चॅनेल सुरू केला होता.

त्याचे व्हिडीओही खुप व्हायरल होत असतात. जेव्हापण अमित व्हिडीओ अपलोड करतो त्याचे व्हिडीओ ट्रेडिंगला असतात. तसे बघायचे झाले तर त्याचे व्हिडीओ पारिवारीक असतात म्हणजे त्याचे व्हिडीओ तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत पाहू शकता.

गौरव चौधरी: गौरव चौधरी हे नाव तुम्ही एकलेच असेल. लोक त्यांना टेक्निकल गुरूजी म्हणून ओळखतात. त्यांचे युट्यूबवर १७.२ मिलीयन सब्सक्राईबर आहेत. ते नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची माहिती देतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गॅजेट्स अनबॉक्स केले आहेत.

त्याचसोबत ते तंत्रज्ञानाच्या जगतातील बातम्याही लोकांना देत असतात. रोज ते एकदातरी सगळ्यांना तंत्रज्ञानाच्या घडामोडी सांगतात. गौरव चौधरी जरी भारतीय असले तरीपण ते दुबईचे रहिवासी आहेत. भारतातील एकमेव आणि सगळ्यात मोठा टेक्नीकल चॅनल गौरव चौधरी यांचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.