टोमॅटोवर घरी बसून केला भन्नाट प्रयोग, बाजार भावापेक्षा कमवले दुप्पट पैसे

0

 

टोमॅटोला भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले, असे अनेकदा आपण पाहिले असेल. लॉकडाऊनमध्ये अशीच वेळ आली होती, पण असे असताना खचून न जाता एका २५ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने टोमॅटोंवर एक प्रयोग केला आणि त्यातून तो शेतकरी आता लाखोंची कमाई करत आहे.

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचे नाव समीर गोस्वामी असे आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खुप अडचण झाली होती, अनेकांना तो विकताही येत नव्हता. अशीच परिस्थिती समीरच्या शेतीतील टोमॅटोंची होती. त्यामुळे समीर यांच्या १० टन टोमॅटोंचे नुकसान होणार होते.

त्यांचे १० टन टोमॅटो खराब होणार होत होते, पण समीर यांनी ते फेकून दिले नाही. त्यांनी तीन दिवस मेहनत घेतली आणि त्याची पावडर बनवली, ती पावडर विकून त्यांनी दोन लाख रुपये कमवले आहे.

समीर यांनी गेल्यावर्षी एक सोलर एनर्जीवर चालणारा एक ड्रायर खरेदी केला होता. पण त्यांना माहित नव्हते की याचा उपयोग टोमॅटोसाठी होणार आहे. त्यांनी टोमॅटोची शेती केली होती. त्यांना १० टन टोमॅटोंचे उत्पन्न मिळाले होते, पण लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांना टोमॅटो विकणे शक्य होत नव्हते.

एकवेळ तर अशी आली होती की त्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागणार नव्हते. पण त्यांनी ड्रायरचा वापर केला. सर्व टोमॅटोंची पावडर तयार केली. त्यांनी सर्व टोमॅटोंमधून ७०० किलो टोमॅटोची पावडर तयार केली.

समीर यांना माहिती होते की देश विदेशातील वेगवेगळ्या कंपन्या टोमॅटोंची पावडर खरेदी करतात. समीर यांनी त्या कंपन्यांना २५ हजार रुपये क्विंटलने पावडर विकले, असाप्रकारे त्यांनी दोन लाख रुपयांची कमाई केली. जर लॉकडाऊन नसते त्या टोमॅटोंची किंमत फक्त १ लाख रुपये असती.

आता समीर फक्त टोमॅटोच नाही तर हळद, अदरक, कैरी यांची ड्रायरच्या मदतीने पावडर बनवत आहे. सध्या बाजारात कैऱ्यांना भाव नसल्याने त्याची पावडर बनून आमचुर्ण तयार केले जात आहे. त्यातून सुद्धा समीर चांगली कमाई करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.